लिंगायत समाजाच्या दफनभूमी जागेसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात कडेगावच्या तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी डाइंगडे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी तहसीलदार पाटील यांनी दोन्हींकडील बाजू ऐकून घेऊन कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये ही जागा दानपत्राने दफनभूमीसाठी देण्यात आल्याचे दिसून आले. मात्र हे दानपत्र उपलब्ध नसल्यामुळे या जागेच्या चतु:सीमा स्पष्ट झाल्या नाहीत.
यामुळे तहसीलदार पाटील यांनी संबंधितांना दानपत्र शोधण्यास सांगितले. बाजूच्या शेतकऱ्याला ही दोन गुंठे जागा या गटात कोठेही द्यावी लागेल, असे सांगितले. याबाबत निर्णय घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली.
यावेळी सरपंच प्रकाश मोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिलीप जाधव, ग्रामविकास अधिकारी उत्तमराव पाटील उपस्थित होते.
फोटो :
देवराष्ट्रे येथे दफनभूमी जागेवर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत तहसीलदार शैलेजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दांईगडे, संतोष गोसावी आदी.