शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

कमिशनवरून कचरा प्रकल्पाला विघ्न

By admin | Published: December 09, 2014 11:49 PM

मुहूर्तावरच ठेच : प्राथमिक बैठकीत २ लाखांच्या खर्चावरून वाद

सांगली : महापालिका क्षेत्रातील कचऱ्यापासून इंधन निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पहिल्याच घासाला खडा लागला आहे. यापूर्वी अनेक कंपन्यांनी कन्सल्टन्सीच्या नावाखाली महापालिकेचे कोट्यवधी रुपये लुटल्यामुळे काही सदस्यांनी प्रकल्प सादरीकरणाच्या बैठकीतच कमिशनचा विषय उपस्थित केला. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात ही बैठक गुंडाळण्यात आली. तरीही प्रशासनाला अजूनही या प्रकल्पाबद्दल आशा आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प पुढे आला. टाटा कन्सल्टन्सीने यासाठी पुढाकार घेतला. या कंपनीसह या प्रकल्पासाठी इच्छुक असणाऱ्या ‘दाराशॉ’ या कंपनीच्या काही प्रतिनिधींसोबत महापालिका पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक आज, मंगळवारी महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. स्थायी समितीच्या सभागृहात कंपनी प्रतिनिधींनी या प्रकल्पाबाबतची माहिती दिली. पदाधिकारी व सदस्यांनी कंपनी प्रतिनिधींशी चर्चा केली. प्रकल्पाच्या अनुषंगाने काही शंकाही उपस्थित झाल्या. सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी यांनी कंपनीला द्याव्या लागणाऱ्या कमिशनबाबतचा प्रश्न उपस्थित केला. आवटी म्हणाले की, आजवर अनेक कंपन्यांनी महापालिकेला चुना लावला आहे. यामध्ये पाच ते साडेपाच कोटी रुपये केवळ कमिशनपोटी महापालिकेला द्यावे लागले. प्रत्यक्षात यातील एकही प्रकल्प अस्तित्वात आला नाही. त्यामुळे कंपनीला कमिशन देताना प्रकल्पपूर्तीची हमी घेणार का, असा सवाल उपस्थित केला. आयुक्त अजिज कारचे यांनी सांगितले की, कंपनीला प्रकल्प अहवालासाठीच सुरुवातीला पाच लाख रुपये देण्यात येतील. मात्र, कमिशनपोटी द्यावी लागणारी रक्कम शासन अनुदान ज्या पद्धतीने प्राप्त होईल त्या पद्धतीनेच देण्यात येईल. महापालिकेवर याबाबत कोणताही बोजा पडणार नाही. त्यामुळे सदस्यांनी फी व कमिशनबाबतची शंका मनातून काढून टाकावी, असे आवाहन केले. यावर नगरसेवक शेखर माने म्हणाले की, असे असेल तर सादरीकरणाच्या बैठकीवेळीच पुढील स्थायी समिती बैठकीसमोर या प्रकल्पाअंतर्गत २ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव कसा आला? याबाबत आयुक्तांनी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करताच आवटी व अन्य नगरसेवकांनी, अशा पद्धतीने खर्च वाढत जाऊन प्रकल्पाऐवजी कमिशनपोटीच लाखो रुपये वाया जातील, असे मत व्यक्त केले. त्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव मी मागे घेत आहे, असे सांगत बैठक संपविली. या बैठकीस महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, गटनेते किशोर जामदार, स्थायी सभापती संजय मेंढे, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, टीना गवळी व अन्य नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)आयुक्त नाराजबैठकीत स्पष्टीकरणानंतरही शंका उपस्थित झाल्याने आयुक्तांनी बैठक आटोपती घेतली. सदस्यांनी प्रकल्प व्हावा, अशीच भावना व्यक्त केली होती, मात्र शंका वाढल्यामुळे आयुक्तांनी नाराजीतच बैठक संपविली.