शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

सांगली जिल्ह्यातील दुधाचे ९० टक्के वितरण ठप्प, भाजीपाल्याची आवक घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 2:35 PM

सांगलीच्या दक्षिण व पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाल्याने मंगळवारी दूधसंकलनावर मोठा परिणाम झाला. एकूण दूध वितरणापैकी ९0 टक्के दूध वितरण होऊ शकले नाही.

सांगली - सांगलीच्या दक्षिण व पश्चिम भागातील प्रमुख मार्ग महापुराने बंद झाल्याने मंगळवारी दूधसंकलनावर मोठा परिणाम झाला. एकूण दूध वितरणापैकी ९0 टक्के दूध वितरण होऊ शकले नाही. महापूर असेपर्यंत दूधसंकलनाची स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुधाची मोठी टंचाई जिल्ह्यात जाणवणार आहे. सांगली जिल्ह्यात प्रतिदिन ५ लाख ९ हजार लिटर दूधसंकलन होत असते. यातील ४ लाख १२ हजार लिटर दूध हे खासगी डेअºयांमार्फत तर ९७ हजार ५00 लिटर दूध सहकारी डेअºयांमार्फत येत असते. बहुतांश खासगी डेअºया या सांगलीच्या दक्षिण, पश्चिम भागातील आहेत. याच मार्गावर जलकोंडी झाल्याने मंगळवारी ९0 टक्के दूध संकलन घटले. पुणे, मुंबईकडे जिल्ह्यातून जाणाºया दुधाचे वितरणही अडचणीत आले आहे. अनेक प्रमुख मार्ग बंद असल्याने उत्पादीत व प्रक्रिया केलेल्या दुधाची वाहतूक कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दूध न आल्याने विक्रेत्यांनाही मंगळवारी पळापळ करावी लागली. छोट्या, मोठ्या दुकानांमधील दूधही आता संपुष्टात आले आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात दुधाची टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. वारणा, चितळे, स्वाभिमानी, अमुल, स्फुर्ती अशा डेअ-यांकडील येणा-या दुधाच्या वाहतुकीसमोर अडचणीत आहेत. त्याचबरोबर शहरातील स्थानिक दूध डेअ-याही सध्या पाण्यात आहेत. सांगलीच्या गवळी गल्ली, गावभाग परिसरात आता पुराचे पाणी शिरल्याने त्याठिकाणाहून येणारा स्थानिक दूधपुरवठाही ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत आता दुधाच्या अडचणीची भर पडली आहे. दुधाबरोबरच स्थानिक बाजारात भाजीपाल्याची आवकही घटली आहे. कर्नाटकसह जयसिंगपूर, शिरोळ, तुंग यासह मिरजेच्या पश्चिम भागातील गावातून येणारा भाजीपाला बंद झाला आहे. केवळ मिरज पूर्व भागातूनही भाजीपाल्याची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा अत्यंत कमी असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. येत्या काही दिवसात आणखी दरवाढ होऊन भाजीपाल्याच्या महागाईचा त्रासही नागरिकांना होऊ शकतो. एरवी ३० ते ४० रुपये किलो असणारी भाजी चक्क ८० ते १०० रुपये अशा दुप्पट दराने विकली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे खर्चाचे बजेट कोलमडले आहे. एक महिना पावसाची संततधार सुरू असून, काही भाज्यांची वाढ मंदावली आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवकही कमी झाली आहे. नाईलाजाने चढ्या दराने भाजी खरेदी करावी लागत आहे.

टॅग्स :milkदूधfloodपूरSangliसांगली