लोकमत न्यूज नेटवर्क
जत : स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त जत तालुक्यातील दोन हजार पाचसे शालेय विद्यार्थ्यांना मोफत पंधरा हजार वह्यांचे वाटप केले.
रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत, कन्या हायस्कूल जत, के. एम. हायस्कूल जत, जिल्हा परिषद उर्दू शाळा जत, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा नंबर १ व २ आणि जिल्हा परिषद कन्या शाळा जत येथील एकूण दोन हजार पाचसे मुलांना १५ हजार वह्यांचे मोफत वाटप केले आहे.
यावेळी भारती विद्यापीठाचे प्राचार्य सी. एस. भिंताडे, आमदार विक्रम सावंत यांचे चिरंजीव धैर्यशील सावंत, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. युवराज निकम, गणेश गिड्डे, अतुल मोरे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, पी. एम. माळी, ओबीसी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी, मोहन माने-पाटील, मेघना शिंदे, मीरा शिंदे आदी उपस्थित होते.