ओळ : माळवाडी (ता. पलूस) येथे शरद लाड, सुरेंद्र वाळवेकर, मोहन पाटील, महावीर चौगुले, स्वप्निल तावदर यांनी चारा वाटप केले.
पलूस : पलूस तालुक्यातील दुहेरी संकटाला दोन हात करताना क्रांती समूहाच्या माध्यमातून मदत कार्यासाठी यंत्रणा उभी करून आमदार अरुण लाड यांनी पूरबाधित क्षेत्रातील पशुधनासाठी ओल्या चाऱ्याची व्यवस्था केली.
आमदार अरुण लाड यांनी तालुक्यातील माळवाडी, सांडगेवाडी येथील वाईन पार्क, पलूस एमआयडीसी, धनगाव, आमनापूर, खंडोबाची वाडी येथे सुरक्षितस्थळी पशुधन हलवून तेथे चाऱ्याची व्यवस्था केली. कोणतेही पशुधन चाऱ्यावाचून राहणार नाही अशी खबरदारी आम्ही घेऊ, नागरिकांनी घाबरू नये, क्रांती उद्योग समूह आपल्या पाठीशी आहे, फक्त तुम्ही काळजी घ्या, सुरक्षित स्थळी राहा, कोणतीही अडचण आली तर गावात कार्यरत आमच्या यंत्रणेशी संपर्क साधा, असे आवाहन त्यांनी केले. पूरपट्ट्यात क्रांती उद्योग समूहाने मदतकार्यासाठी फळी उभी केली आहे.
250721\1834-img-20210725-wa0033.jpg
अरुण लाड चारा वाटप