शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

 पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 2:10 PM

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ​​​​​​​

सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.वारणा सहकारी दूध उत्पादक संघाकडून हायग्रेन प्यालेट ५० नग, महाड मॅन्यूफॅक्चर असोसीएशनकडून ५० किलोच्या २०० पशुखाद्य पिशव्या, सुमित ट्रेडर्स मुंबई जनरल मॅनेजर, देवनार गोवंडी यांच्याकडून 360 ब्लिचिंग पावडर पिशव्या, उत्तम कोळेकर भिवंडी मंबई यांच्याकडून ६० ब्लिचिंग पावडर पिशव्या, पशुधन विकास विभाग रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त पशुखाद्य, बारामती ॲग्रो लिमिटेड यांच्याकडून १० टन पशुखाद्य, पालघर एमएमए संस्था महाड यांच्याकडून ६१० पोती मीठ, व्यवस्थापक आयआरबी रायगड यांच्याकडून ५ टन हिरवा चारा पूरग्रस्त भागात वितरीत करण्यात आले आहे.

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून २५० पिशव्या पशुखाद्य, जिल्हा प्रशासन रायगड व पशुधन विकास अधिकारी माणगाव कर्मचारी संघटना यांच्याकडून ३ टन ओला चारा, ७ टन सुखा चारा, कडबा कुट्टी २५ किलो, भाताचा कोंडा २५ किलो आणि नेचर डेअरी कळस इंदापूर यांच्याकडून ८ हजार ३७० किलो ऊस व जयहिंद गोळी पेंड १०० पिशव्या, रायगड जिल्ह्यातून ६ टन चारा प्राप्त झाला आहे. पशुधनासाठी प्राप्त चारा व खाद्य पूरग्रस्त भागात वितरीत करण्यात आले आहे. 

पूरग्रस्त बाधित कुटुंबांना 13 कोटी 92 लाखाचे सानुग्रह वाटपसांगली  जिल्ह्यात पुरामूळे बाधित झालेल्या कुटूंबांना रूपये ५ हजार प्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत आहे. दिनांक १७ ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील १९ हजार १३९ आणि शहरी भागातील ८ हजार ७०१ कुटूंबांना १३ कोटी ९२ लाखाचे सानुग्रह अनुदान पूरग्रस्त कुटूंबांना वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात १० हजार आणि शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी ५ हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना २०० टीममार्फत सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. सानुग्रह वितरणाच्या मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यातून महसूलचे ५२ कर्मचारी उपलब्ध झाले असून यामध्ये ४७ तलाठी आणि ५ सर्कल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने सानुग्रह अनुदान वितरण करण्यास मदत होणार आहे, असे अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.मिरज तालुक्यातील पूरबाधितांना वाटपासाठी ११४० किट रवानापूरग्रस्तांना अनेक सेवाभावी, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून प्राप्त होणारी मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे किट तयार केले जात आहे. आम्ही पंचवटीकर साई निर्माण संस्था महाड आणि जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन) यांच्याकडून प्राप्त झालेल्या मदतीतून जीवनावश्यक वस्तूचे तयार केलेले ११४० किट मिरज तालुक्यातील पूरबाधित कुटूंबांना वाटप करण्यासाठी रवाना झाले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारी