यावेळी विठ्ठलराव याळगी, शामराव साखरे, डॉ. यशवंत तोरो, कौस्तुभ रामदासी, गायिका श्रद्धा दांडेकर - जोशी, दीप्ती कुलकर्णी, मनीषा नाडगौडा व अस्मिता आळतेकर यांना नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्चित पोटणीस, आर्य चिपलकट्टी, केतकी काळे यांना फंटूश गुणवंत बाल पुरस्कार देण्यात आला.
महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, प्राचार्य एस. एम. जोशी, चिंतामणी शिवराम पटवर्धन, ॲड. शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी कवी संमेलनात सांगली, कोल्हापूर व बेळगाव येथील कवी सहभागी होते. यावेळी गायिका श्रद्धा जोशी-दांडेकर यांचे गायन केले. मीरा लिमये यांच्या ‘उमलती कळी’ कथासंग्रहाचे, तसेच नवरत्न मेळावा पुस्तिकेचे प्रकाशन झाले. यावेळी उगार शुगरचे संचालक प्रफुल्ल शिरगावकर, स्मिता शिरगावकर, एम. बी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अंजली गोखले व धनंजय पाठक यांनी केले. प्रकाश कुलकर्णी, चिंतामणी पटवर्धन, वैभव कुलकर्णी, वैशाली गद्रे, अरविंद साठे, प्रा. सुजाता खराडे, स्वानंद कुलकर्णी, प्रा. विद्या बेल्लारी यांनी संयोजन केले.