आष्टा येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलीपराव वग्यानी,विराज शिंदे, रघुनाथ जाधव यांच्याहस्ते मास्क, सॅनिटायझर वाटप केले. यावेळी संग्राम फडतरे, शिवाजी चोरमुले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पोलीसदादा,तुम्ही रात्रंदिवस बजावत असलेल्या ड्यूटीमुळे आम्ही सुखाने राहत असतानाच,आपण कोरोनाच्या संकटाविरोधात रस्त्यावर पाय रोवून उभा राहिल्याने कोरोना काहीसा आटोक्यात आला आहे. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान असून आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत, अशा भावना युवा नेते प्रतीक पाटील यांनी पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. वाळवा तालुक्यातील इस्लामपूर,आष्टा,कासेगाव,कुरळप येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा ३१५ जणांना मास्क,सॅनिटायझर व सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले.
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, प्रा.शामराव पाटील, पक्षप्रतोद संजय कोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष एम.जी. पाटील, आष्टा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष संग्राम फडतरे, युवक शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, ज्येष्ठ नेते रघुनाथ जाधव, कासेगाव येथे माजी जि. प.अध्यक्ष देवराज पाटील, जि.प.सदस्या संगीता पाटील,सरपंच किरण पाटील,ज्ञानदेव पाटील तर कुरळप येथे जि.प.सदस्य संजीव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे वाटप केले आहे.
इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,आष्ट्याचे पोलीस निरीक्षक सिद्ध,कासेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश मते, कुरळपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मदत स्वीकारताना कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाचे समन्वयक इलियास पिरजादे,संघटक विनायक मुळीक,राजाराम जाधव, शशिकांत वायदंडे, प्रसाद शेळके, विनायक जगताप यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.