कुरळप : राजारामबापू साखर कारखान्याने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यासह मिरज तालुक्यातील पश्चिम भागातील आठ गावात अद्ययावत २० ऑक्सिजन मशीन दिल्या आहेत, असे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी सांगितले.
कुरळप, चिकुर्डे व येडेनिपाणी येथे कारखान्याच्या वतीने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मशीन वाटप करण्यात आले.
पाटील म्हणाले, कुरळप येथील मराठी शाळेत आयसोलेशन सेंटर लवकरच सुरू करीत आहो.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजीव पाटील, संचालक विलासराव पाटील, पी. जी. पाटील, सरपंच शोभा पाटील, खंडेराव घनवट, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागनाथ चौगुले, डॉ. विजय देवकर, डॉ. राजेंद्र साळुंखे उपस्थित होते.
येडेनिपाणी येथे डॉ. प्रकाश पाटील, सरपंच डॉ. सचिन पाटील, पं.स. सदस्य आनंदराव पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.
चिकुर्डे येथे पं.स. सदस्या सुप्रिया भोसले, चांदसाहेब तांबोळी, रावसाहेब भोसले, सूतगिरणीचे संचालक दिलीपराव खांबे उपस्थित होते.
फोटो ओळी : २८०५२०१९-आयएसएलएस-राजारामबापू ऑक्सिजन मशीन : कुरळप येथे राजारामबापू कारखान्याच्या वतीने ऑक्सिजन मशीन वाटपप्रसंगी पी.आर. पाटील, विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, संजीव पाटील उपस्थित होते.