लोकमत न्यज नेटवर्क
वांगी : वांगी विकास सोसायटीने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहणार आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी यांनी केले.
वांगी (ता. कडेगाव) येथील वांगी विविध कार्यकारी विकास सोसायटीतर्फे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला उपाध्यक्ष शिवाजी मोहिते, माजी अध्यक्ष हणमंत सूर्यवंशी, आबासाहेब मोकळे, आनंदराव सूर्यवंशी, माणिक सूर्यवंशी, बॅंकेचे शाखा अधिकारी लालासाहेब माने, शिवाजी वत्रे उपस्थित होते.
बाबासाहेब सूर्यवंशी म्हणाले की, शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संस्थेने ट्रॅक्टर, रोटावेटर, विहीर पाडणे, शेतकरी घर बांधणे, पाईपलाईन करणे आदी कारणांसाठी कर्जपुरवठा केला आहे. संस्थेचे ऑडिट गेल्या पाच वर्षांपासून ‘अ’ वर्ग असून, संस्थेने सभासदांना डिव्हिडंडचे वाटपही केले आहे.
यावेळी संजय औधे, लक्ष्मण कांबळे, शरद मोहिते, महेश औधे, वैभव कणसे, आकाराम सूर्यवंशी, शहाजी सूर्यवंशी, महादेव गुरव, दतात्रय एडके, सतीश शिर्के, राजाराम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.