इस्लामपूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आषाढी एकादशीनिमित्त ५०० तुळशीच्या रोपांचे वाटप तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याहस्ते करण्यात आले.
सबनीस म्हणाले, तुळस हे भारतातील एक पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेले एक बहुपयोगी रोपटे आहे. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. प्रत्येक घरासमोर एक तुळस असल्यास घरातील हवा शुद्ध होते. तुळस रोप वाटप हा उत्कृष्ट असा उपक्रम आहे. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अशोक वीरकर, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. आनंदा पाटील, शिवप्रतिष्ठानचे विश्वास भोसले, अजित जाधव, अरविंद पाटील, शेखर खांडेकर यांनी संयोजन केले.
फोटो : २० इस्लामपुर २
ओळ : इस्लामपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याहस्ते तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी अशोक वीरकर, बाळासाहेब गायकवाड, गजानन पाटील उपस्थित होते.