शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिल्हा बॅँकेच्या कारवाईला लॉकडाऊनने बसली खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 6:23 PM

संबंधित संस्थांना मालमत्तेचा ताबा घेण्यासंदर्भात रजिस्टर नोटीस पाठवावी लागते. गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर पोस्टलची सेवा बंद असल्याने बँकेला संबंधित संस्थांना नोटिसा पाठविता आल्या नाहीत. त्यामुळे सेक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत मालमत्ता ताब्यात घेणे, मुदतीत वसुली झाली नाही, तर मालमत्तांचा लिलाव काढणे अशी प्रक्रिया अद्याप झालेली नाही

ठळक मुद्देसेक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट : संस्थांवरील वसुलीची कारवाई लांबणीवर जाणारलॉकडाऊन संपल्याशिवाय बँकेला कारवाई करणे अडचणीचे ठरणार आहे.

सांगली : जिल्ह्यातील बड्या थकबाकीदार आणखी सात संस्था जिल्हा बँकेच्या ‘रडार’वर असून त्यांच्यावर सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करण्यास लॉकडाऊनचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जप्ती व वसुलीची कारवाई लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्हा बँकेमार्फत गेले दोन महिने जिल्ह्यातील बड्या थकबाकीदार संस्थांकडील वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये बँकेने ५ मोठ्या संस्थांवर सेक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत कारवाई केली. सहकारी साखर कारखाने, सूतगिरणी व अन्य अशा एकूण ७ संस्थांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव काढला. दोनवेळा निविदा प्रसिद्ध करूनही लिलावास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या मालमत्ता आता जिल्हा बँकेच्या मालकीच्या झाल्या आहेत.एप्रिल महिन्यामध्ये आणखी सात संस्थांवर कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीपोटी कारवाई करण्यात येणार होती, मात्र लॉकडाऊनमुळे प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत.

संबंधित संस्थांना मालमत्तेचा ताबा घेण्यासंदर्भात रजिस्टर नोटीस पाठवावी लागते. गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर पोस्टलची सेवा बंद असल्याने बँकेला संबंधित संस्थांना नोटिसा पाठविता आल्या नाहीत. त्यामुळे सेक्युरिटायझेशन कायद्याअंतर्गत मालमत्ता ताब्यात घेणे, मुदतीत वसुली झाली नाही, तर मालमत्तांचा लिलाव काढणे अशी प्रक्रिया अद्याप झालेली नाही. त्यामुळे बँकेला यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. लॉकडाऊन संपल्याशिवाय बँकेला कारवाई करणे अडचणीचे ठरणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातील सक्षम बँक असून वसुलीसाठी त्यांनी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. बँकेला यंदा ९१ कोटीचा नफा झाला असून बड्या थकबाकीदार संस्थांकडील वसुली झाल्यानंतर बँकेची आर्थिक परिस्थिती आणखी सक्षम होणार आहे. त्यामुळे बँकेने सध्या या बड्या संस्थांच्या थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

बँकेची थकबाकी : ४५० कोटींवरबड्या तीस थकबाकीदारांपैकी सात संस्थांकडेच सुमारे ४५० कोटींवर थकबाकी होती. यामध्ये माणगंगा साखर कारखाना, महांकाली साखर कारखाना, विजयालक्ष्मी मिल, डिवाईन फूड्स, प्रतिबिंब गारमेट, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी, रामानंद भारती सहकारी सूतगिरणी यांचा समावेश आहे. यातील सातही संस्थांच्या मालमत्ता जिल्हा बँकेच्या मालकीच्या झाल्या आहेत. अन्य सात संस्थांकडे असलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी आगामी दोन महिन्यात वसूल करण्याबाबत बँकेचे प्रयत्न चालू आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच बँकेला त्याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :bankबँकSangliसांगली