सचिन लाड -- सांगली --महामार्गावर बेदरकार आणि बेशिस्त वाहतुकीचे सातत्याने बळी जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात साडेतीन हजार अपघातात एक हजार ५१३ जणांचा बळी गेला आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. याठिकाणी उपाययोजना करूनही अपघाताला आळा बसलेला नाही.मालिका सुरूच वाहनचालकांमध्ये ओव्हरटेक करून पुढे जाण्याची घाई आणि वेगाची नशा, या दोन प्रमुख गोष्टी अपघात होण्यास कारणीभूत आहेत. गेल्या दहा वर्षांत जिल्ह्यात प्रत्येकवर्षी अपघातांच्या संख्येत वाढच होत आली आहे. २०१३ मध्ये सांगली-तासगाव रस्त्यावरील चिंतामणीनगर रेल्वे पुलावर भरधाव सुमोने समोरुन रिक्षाला धडक दिली. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही सातत्याने अपघात होतात. मिरज-पंढरपूर, म्हैसाळ या मार्गावरही अपघात होतात.मानवी चुकाच कारणीभूतजिल्ह्यात २०१३ मध्ये २६० जणांचा अपघातामध्ये बळी गेला. २०१२ मध्ये ३१४ जणांचा बळी गेला होता. यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. अपघाताची ६४ ठिकाणेतत्कालीन पोलिसप्रमुख सावंत यांनी जिल्ह्यात अपघाताच्या ठिकाणांचा सर्व्हे केला होता. या सर्व्हेतून जिल्ह्यात अपघाताची ६४ ठिकाणे असल्याचे आढळून आले होते.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत गेला दीड हजार जणांचा बळी
By admin | Published: July 21, 2016 11:43 PM