लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यावर गतवर्षी कृपादृष्टी दाखविणाºया पावसाने यंदा अवकृपा केल्याचे चित्र शासकीय दप्तरातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ३१ आॅगस्टअखेर केवळ ५२ टक्केच पाऊस बरसला आहे. धरणांमध्ये पुरेसा साठा असला तरी, तलाव, बंधाºयांचे कोरडेपण तितकेच चिंताजनक आहे.सांगली जिल्ह्यात गतवर्षी ३१ आॅगस्टअखेर एकूण सरासरी ५०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा आॅगस्टअखेर केवळ सरासरी २३५ टक्केच पाऊस बरसला आहे. सधन तालुक्यांनाही दुष्काळाच्या छायेने कवेत घेतल्याचे चित्र दिसत आहेत. जिल्ह्याचे भवितव्य आता परतीच्या पावसावर अवलंबून असले तरी, हा पाऊसही बेभरवशाचा असतो. त्यामुळे चिंतेच्या ढगांची दाटी जिल्ह्यावर दिसत आहे. सध्या ३२ गावांमध्ये १४0 टॅँकर सुरू आहेत. ऐन पावसाळ््यातही टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यांसह मिरज पूर्व भागात नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते. तरीही गतवर्षी याठिकाणी समाधानकारक पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात दुष्काळी तालुक्यांना मोठा पाऊस झाला, मात्र नंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे दुष्काळी भागातील तलाव आणि बंधाºयांना कोरडेपणा प्राप्त झाला आहे.सांगली जिल्ह्यातील सधन व मोठ्या पावसाचे तालुके म्हणून वाळवा, शिराळा तालुक्यांची ओळख आहे. यावर्षी या सधन तालुक्यांनाही पावसाने झटका दिला आहे. गतवर्षाच्या तुलनेत या दोन्ही तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पावसापेक्षाही प्रमाण कमी आहे.मिरज मध्य व पश्चिम भागासह, तासगाव, कडेगाव, पलूस या भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस असतो. यंदा या तालुक्यांनाही पावसाचा झटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर सर्वत्र दुष्काळाची छाया अधिक गडद होत चालली आहे. नागरिकांची तसेच प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.दुष्काळी भागाचे आकडे : गोंधळात टाकणारेगतवर्षाच्या पावसाची तुलना करता जिल्ह्यात सरासरी ५२ टक्केच पाऊस झाला आहे. वास्तविक सरासरी पावसाची तुलना केली तर जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यातील पावसाची टक्केवारी ७0 ते ८0 टक्क्यांच्या घरात जाते. तशीच नोंद शासकीय दप्तरीही झाली आहे. ५0 टक्केपेक्षा कमी पाऊस असलेला एकच तालुका आकडेवारीत दिसतो. वास्तविक सरासरी पावसाचे दुष्काळी तालुक्यातील प्रमाण कमीच असल्यामुळे त्याठिकाणी यंदा पडलेल्या पावसाने टक्केवारी अधिक दिसते. दुसरीकडे गतवर्षी जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली. दुष्काळी तालुक्यातही पाऊस पडला. यंदाही मान्सूनच्या सुरुवातीलाच दुष्काळी तालुक्यात मोठा पाऊस झाल्याने गतवर्षाची तुलना करता पावसाची टक्केवारी ६0 ते ८0 टक्क्याच्या घरात दिसते. वास्तविक गेल्या दोन वर्षात पडलेल्या पावसापेक्षाही अधिक पावसाची गरज या तालुक्यांना आहे.तलाव, बंधारे कोरडेजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून चांगले काम झाले असले तरी, पावसाच्या अवकृपेने या कामावर पाणी पडले आहे. बंधारे आणि तलावांच्या साठ्याची स्थिती चिंताजनक आहे. त्याचबरोबर विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे वर्षभर या जलस्रोतांचा उपयोग होणार नाही. सिंचन योजनांवरच आता दुष्काळी तालुक्यांची मदार आहे.धरणांमधील पाणीसाठा समाधानकारकवारणा आणि कोयना धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे. किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी सतावणार नाही, अशी चिन्हे आहेत. वारणा धरण शंभर टक्के भरले आहे.हवामान खात्यावर भरोसा नायभारतीय हवामान खात्यावर विसंबून राहिल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकºयांचे मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नुकसान झाले.गेल्या तीन महिन्यात क्वचितच हवामान खात्याचे अंदाज बरोबर ठरले आहेत. त्यामुळे यापुढील अंदाजावरही कोणाचा भरोसा राहील, याबाबत साशंकताच आहे.मिरज, सांगली टक्केवारीत पिछाडीवरगतवर्षापेक्षा यंदा मिरज तालुक्यात केवळ २0 टक्के, सांगली क्षेत्रात ३३ टक्के, पलूसमध्ये ३६ टक्के, तासगावमध्ये ४३ टक्के, शिराळ््यात ४६ टक्के, इस्लामपूरमध्ये ४६ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी पावसाशी तुलना करता ही टक्केवारी वाढते.
जिल्ह्यात गतवर्षापेक्षा केवळ ५२ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:47 PM
सांगली : जिल्ह्यावर गतवर्षी कृपादृष्टी दाखविणाºया पावसाने यंदा अवकृपा केल्याचे चित्र शासकीय दप्तरातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
ठळक मुद्दे यंदा दुष्काळाची छाया गडद : बंधारे, तलावांचे कोरडेपण चिंताजनक गतवर्षी जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाली. दुष्काळी तालुक्यातही पाऊस पडला. जिल्ह्यावर सर्वत्र दुष्काळाची छाया अधिक गडद होत चालली आहे