२६ प्रहार
सांगलीत राधाकृष्ण देवढे यांच्या सत्कारप्रसंगी रामदास कोळी, शीतल दबडे, सुरेश गायकवाड, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे जिल्हा परिषदेतील समाजकल्याण अधिकारी राधाकृष्ण देवढे यांचा सहायक आयुक्तपदी बढतीबद्दल सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे उपस्थित होत्या. शाहीन शेख जिल्हा परिषदेत सुमारे साडेतीन वर्षे समाजकल्याण अधिकारी म्हणून काम केल्यानंतर देवढे यांची अहमदनगरला पदोन्नतीवर सांगलीतील कार्यकाळात त्यांनी दिव्यांगांसाठी बरेच प्रकल्प राबविले. दिव्यांगांच्या योजनांना चालना दिली. सत्कारप्रसंगी ते म्हणाले की, जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेत दिव्यांगांचे प्रमाण चांगले राहिल्याबद्दल निवडणूक आयोगाने गौरविले. यामध्ये प्रहार संघटेनेचा सिंहाचा वाटा आहे. प्रभारी समाजकल्याण अधिकारी संभाजी पवार यांचे संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले.
राज्याच्या क्रिकेट संघात निवड झालेले दिव्यांग खेळाडू अमोल कोळी, अक्षय यादव, जोतीराम कदम, भगवान भंडारे यांचा सत्कार यावेळी झाला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांनी प्रास्तावना केली. संपर्कप्रमुख शीतल दबडे, सुरेश गायकवाड यांनी संयोजन केले. प्रहार संघटनेच्या जत, वाळवा, मिरज, पलूस, खानापूर, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुका कार्यकारिणींचे पदाधिकारी व दिव्यांग यावेेळी उपस्थित होते. संपत कदम यांनी सूत्रसंचालन केले.
------------------------