शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जिल्ह्यात टॅँकर, गाड्या अडवून दूध ओतले

By admin | Published: June 02, 2017 12:13 AM

जिल्ह्यात टॅँकर, गाड्या अडवून दूध ओतले

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या संपास गुरुवारी हिंसक वळण लागले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुधाचे टॅँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले, तर काही ठिकाणी वाहनांचे टायर फोडण्यात आले. संपामुळे बाजारातील शेतीमालाच्या आवकेवरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सांगली जिल्ह्यात गुरुवारपासून शेतकरी संपावर जाण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला होता. गावातून कोणताही शेतीमाल बाजारपेठांमध्ये पाठविला जाणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानुसार शेतीमाल अडविण्यात आला. शेतकऱ्यांनी दूध वाहतुकीवर हल्लाबोल केला. त्यामुळे दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. उमदी (ता. जत) आणि देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे सकाळी शेतकऱ्यांनी दुधाची वाहने अडविली. त्यानंतर त्यातील भरलेल्या कॅनमधील दूध रस्त्यावर ओतण्यात आले. यावेळी ‘जय जवान, जय किसान’ अशा घोषणाही देण्यात आल्या. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमध्येही दूधपुरवठा बंद आंदोलन करण्यात आले. कडेगाव आणि खानापूर तालुक्यांतील आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले. शेतकरी संघटनेच्यावतीने गुरुवारी बागणी (ता. वाळवा) येथे बंद पाळण्यात आला, तर मिरज-पंढरपूर रस्त्यावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेळ््या-मेंढ्यांची वाहतूक करणारी वाहने अडविली. शेतकऱ्यांच्या संपात आता सर्वच संघटना उतरत आहेत. त्यामुळे संपाची व्याप्ती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. दुधाची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतून देण्याच्या प्रकारामुळे दूध पुरवठादार सहकारी संघ, खासगी डेअरीचालकांनी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून संपाचे परिणाम शहरी भागावर दिसून येतील. दूध पुरवठा घटलासंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दुग्धविकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या पहिल्याचदिवशी दूध पुरवठ्यात दहा टक्के घट झाली आहे.भाजीपाला आवकही घटणारजिल्ह्यातील भाजीपाला आवकही येत्या दोन दिवसात घटण्याची चिन्हे आहेत. दुधापाठोपाठ भाजीपाला आणि फळभाज्यांचा पुरवठाही थांबविण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. भाजीपाला आणि फळभाज्यांची सुमारे पाच ते दहा कोटींची दररोजची उलाढाल सांगलीत होत असते. भाजी बाजार सुरळीतभाजीपाला विक्रेते सुभाष पाटील म्हणाले की, गुरुवारी भाजीपाला आणि फळभाज्यांच्या बाजारावर काहीही परिणाम दिसून आला नाही. पुरवठा व्यवस्थित होता. पुढील काही दिवसात काय होईल, याचा अंदाज नाही. पुरवठा बंद होणार असल्याबाबत कोणतीही कल्पना आम्हाला नाही. शेतकऱ्यांशी निगडित आमचा व्यवसाय असल्याने त्यांच्या अडचणींशी आम्ही सहमत आहोत. त्यांनी आवाहन केले, तर आम्ही पुरवठा बंद ठेवू. शुक्रवारी सकाळी आमची दूध संकलन केंद्रे बंद राहणार आहेत. - गिरीश चितळे, संचालक, चितळे डेअरी--बाजार समितीवर परिणाम शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम सांगलीत जाणवू लागला आहे. कोल्हापूर रस्त्यावरील बाजार समितीच्या विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये काल दिवसभरात भाजीपाला, फळे, कांदे, बटाटे यांची आवक पूर्णपणे थांबली. बुधवारी सायंकाळी आवक झालेल्या शेतीमालाचा लिलाव होऊ शकला. शेतीमालाच्या आवकेत ६० टक्के घट झाली. गुरुवारी मात्र शेतीमालाची आवक थांबली. बुधवारी राहिलेल्या शेतीमालाचे सौदे गुरुवारी सकाळी पूर्ण झाले, अशी माहिती फळ मार्केटचे अधिकारी विठ्ठल पाटील यांनी दिली.कांचनपूरमध्ये दगडफेक, मारहाणशेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर कांचनपूर (ता. मिरज) येथून मिरजेला निघालेला दूध वाहतूक टेम्पो रोखून आंदोलकांनी चालकास मारहाण केली. टेम्पोतील सहाशे लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले. या प्रकारामुळे भीतीपोटी एकाने पलायन केले. कवलापूर परिसरातील एका दूध डेअरीचालकाने संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटे दूध संकलन केले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते दूध घेऊन तो मिरजेला निघाला होता. त्यावेळी कांचनपूरजवळ आंदोलकांनी त्याचा टेम्पो अडविला. टेम्पोची दडगफेक करून मोडतोड केली. चालकास मारहाण केल्याने त्याच्या साथीदाराने पलायन केले. या घटनेची पोलिसांत कोठेही नोंद नाही.