शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उंच पर्वतकडे सर करणाऱ्या दिव्यांग काजलपुढे पैशांच्या अडचणींचा डोंगर, किलीमांजारो मोहिमेची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 1:59 PM

मोरोशीचा भैरवगड सर करण्याची थक्क करणारी कामगिरी काजलने केली आहे. अशी जोरदार कामगिरी करणारी पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे. 

सांगली : कळसूबाई शिखरासह अनेक अवघड गिरीशिखरे लीलया पायाखाली घेणाऱ्या काजलला आर्थिक अडचणींच्या डोंगरापुढे मात्र हाराकिरी पत्करावी लागली आहे. यानिमित्ताने समाजाच्या दातृत्वापुढे आव्हान उभे राहिले असून सांगलीकर कन्येच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे.सांगलीत संजयनगरमध्ये राहणारी काजल दयानंद कांबळे बारा वर्षांपूर्वीच्या एसटी अपघातानंतर ४९ टक्के दिव्यांग बनली. शस्त्रक्रियेनंतर डाव्या पायाची उंची कमी झाली, पण काजलने दिव्यांगत्वालाच आव्हान दिले. गिर्यारोहणासारखा अवघड छंद जोपासला. त्यात यशस्वीही ठरली. राज्यातील सर्वोच्च कळसूबाई शिखर सर केले. वजीर सुळका, भैरवगड व हिरकणी कडा सर करणारी पहिली दिव्यांग महिला ठरली. सध्या आफ्रिकेतील किलीमांजारो सर करण्यासाठी तयारी सुरू आहे. मोहिमेचा खर्चही डोंगराएवढा मोठा आहे, यासाठी दातृत्ववान सांगलीकरांना तिने मदतीचे आवाहन केले आहे.काजलची कामगिरीकळसूबाई शिखर, वजीर सुळका, हिरकणी कडा, अंकाई-टंकाई, खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग, रेवदंडा, बिरवडी किल्ला, कोरलाई किल्ला, मुरुड जंजिरा, कुलाबा, बोरीगड, पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती आणि ४०० फूट उंच मोरोशीचा भैरवगड सर करण्याची थक्क करणारी कामगिरी काजलने केली आहे. अशी जोरदार कामगिरी करणारी पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे. किलीमांजारोचे नव्हे, पैशांचेच आव्हानभविष्यात हिमालयातील शिखरे, तसेच सात खंडांतील सर्वोच्च शिखरे तिला खुणावत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील १९३४१ फूट उंचीचे सर्वोच्च शिखर किलीमांजारो त्यापैकीच एक असून काजलचे पुढचे पाऊल त्यावर पडणार आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी २०२३ रोजी शिखरावर तिरंगा फडकवायचा आहे. मोहीम दहा दिवसांची आहे. त्यासाठी ६ लाख ७४ हजार रुपये खर्च येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली