शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

नागपुरात बेमुदत उपोषण करू

By admin | Published: December 03, 2015 12:46 AM

सुमनताई पाटील : ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी आठवड्याची मुदत

कवठेमहांकाळ : बळिराजा पाणी-पाणी म्हणून टाहो फोडत आहे. भाजप सरकार मात्र पाण्याचे राजकारण करीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी देण्याचे टाळत आहे. येत्या सात दिवसात म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी कवठेमहांकाळला दिले नाही, तर नागपूर विधान भवनासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा बुधवारी आमदार सुमनताई पाटील यांनी दिला. आमदार पाटील चार दिवस मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणींची माहिती घेण्यासाठी कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी कुकटोळी, म्हैसाळ (एम), सराटी, कोंगनोळी, रामपूरवाडी, करोली (टी), अग्रण धुळगाव या गावांचा दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी सांगितले, शेती पाण्याविना ओसाड बनत चालली आहे. हातातोंडाला आलेली पिके वाळू लागली आहेत. खरीप वाया गेला, आता रब्बीही वाया जाणार आहे. यासाठी काहीतरी करा. या प्रश्नावर त्यांनी नागपूर येथे उपोषण करण्याचा इशारा दिला. कवठेमहांकाळ हद्दीतून धुळगावकडे येणारा म्हैसाळ योजनेचा पोटकालवा पूर्ण झालेला नाही. त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी उपसरपंच अधिक जाधव यांनी केली. आमदारांचे स्वागत धुळगावच्या सरपंच शारदा जगताप यांनी केले. सखाराम दुधाळ, अण्णासाहेब भोसले, बिरा कदम यांनीही तक्रारी मांडल्या. आमदारांसोबत विजय सगरे, सुरेशभाऊ पाटील, भाऊसाहेब पाटील, टी. व्ही. पाटील, मेघाताई झांबरे, सुरेखा कोळेकर, गजानन कोठावळे उपस्थित होते. (वार्ताहर)