अविनाश बाड ।आटपाडी : आटपाडी तालुका दुष्काळात होरपळत असताना, शासन मका पेरा म्हणत आहे! ज्या तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेले, जिथे वर्षभर पाऊसच पडला नसल्याने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, त्या तालुक्यात तब्बल १५ टन मका बियाणे, जनावरांसाठी चारा करा, असे म्हणत वाटप करून शासनाने एकप्रकारे दुष्काळग्रस्तांची कुचेष्टाच केली आहे.
आटपाडी तालुक्यात दि. १० आॅक्टोबर २०१७ रोजी शेवटचा पाऊस झाला. त्यानंतर वर्ष उलटून गेले, पण पाऊसच आला नाही. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठीही यंदा पाऊस आला नाही. काही भागात विहीर, तलावातील पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी थोडीफार पेरणी केली, ती सुद्धा वाया गेली. दोन्ही हंगामाची आणेवारी ५० पैशाच्या आत आहे. सध्या तालुक्यातील १६ गावात १० टॅँकरच्या ३२ खेपांनी पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टॅँकरच्या पाण्यावर तालुक्यातील २१ हजार ४९५ एवढी लोकसंख्या अवलंबून आहे. टॅँकरची मागणी करणाºया गावांची संख्या वेगाने वाढत आहे.
तीव्र दुष्काळाने माणसाचे जगणे कठीण केलेले असताना, जनावरांचे तर माणसांपेक्षा जास्त हाल सुरू आहेत. दोन्ही हंगाम वाया गेल्याने येथे चारा उपलब्ध नाही. जनावरांच्या पाण्यासाठी शासनाकडे सध्या कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत चाºयासाठी चारा डेपो, छावण्या किंवा शेतकºयांना थेट अनुदान देणे अपेक्षित असताना, शासनाने दि. २९ नोव्हेंबर २०१८ रोजी चाºयाबाबतचा अजब निर्णय घेतला आहे.
शेतकºयांनी जनावरांसाठी चारा निर्माण करावा, त्यासाठी शासनाने केवळ मका बियाणे वाटप करून शेतकºयांना मोठी मदत केल्याचा आव आणला आहे. त्यामुळे संतापही व्यक्त होत आहे.शेतकºयांनी त्यासाठी अर्ज करायचा आहे. ७/१२ उतारा, आधार कार्ड, किती जमीन आहे, त्यापैकी किती जमिनीत मका पेरणार आणि पेरल्यानंतर त्याला खते शेतकºयांनी घालायची आहेत. ३ ते ४ महिन्यांनंतर ५ किलोच्या एका पिशवी पेरणीने ४ ते ५ टन चारा निर्माण होईल, असे शासनाचे गणित आहे. पण पुढचे ३ ते ४ महिने शेतकºयाने मका पिकाला पाणी कुठून घालायचे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.अजब निर्णय : लोक चक्रावलेदि. १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर हा रब्बी हंगामातील पेरणीचा कालावधी असतो. पाऊस नसल्याने यंदा पेरणी झाली नाही. पण आता मका पेरा म्हणणारे शासन जानेवारीत पेरणी करण्याचा सल्ला देऊन शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. तालुक्यात ज्या भागात टेंभूचे पाणी ओढ्याने फिरले, ते पाणी शेतकºयांनी डाळिंबाच्या बागांसाठी आधी पैसे भरून आणले. मका बियाणे शंभर टक्के मोफत असल्याने बोगस योजनेपेक्षा टेंभूचे पाणी मोफत आणि पुरेसे दिले तरच दुष्काळ सुसह्य होईल.हे व्हायला हवे...चारा डेपो आणि चारा छावण्यांत भ्रष्टाचार झाल्याच्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी तक्रारी झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यावेळी जनावरे जगली. त्यांना छावणीत पिण्याचे पाणी मिळाले, हेही खरे आहे. आता तालुक्यात गाई ३२३५५, म्हैशी २९७४०, मेंढ्या ३२६१९ आणि शेळ्या ४८२०२ एवढ्या आहेत. या पशुधनास दररोज ८९० टन ओली वैरण, तर ३५४ टन वाळलेल्या चाºयाची आवश्यकता आहे. दररोज २३ लाख ६१ हजार ४०० लिटर पाणी जनावरांसाठी आवश्यक आहे. शासनाने त्याची सोय करण्याची गरज आहे.
तहान लागल्यावर आड खोदायला सुरुवात करण्याचा हा मूर्खपणा आहे. तालुक्यात प्यायला पाणी नाही. जनावरे चाºयासाठी तडफडत आहेत. आता मका पेरुन तो ४ महिन्यांनी येणार. तोपर्यंत मका पिकाला पाणी कुठले द्यायचे, हे सरकारने सांगावे. वेळकाढूपणा करुन सरकारने शेतकºयांची नुसती चेष्टा सुरु केली आहे.- हणमंतराव देशमुख, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी