कासेगाव : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांनी शेतमजूर, धरणग्रस्त, दीनदलित व शोषित वर्गासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.कासेगाव (ता. वाळवा) येथील थोर स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या प्रथम सुमूर्ती दिनानिमित्त शनिवारी कॉ. नजुबाई गावित यांना ‘क्रांतिवीरांगणा इंदुताई पाटणकर सुमूर्ती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. भारत पाटणकर, विजय घोगरे आदी उपस्थित होते.
कॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, या कार्यक्रमाचा अध्यक्ष करून एकाअर्थाने माझाच सन्मान केल्याची भावना मनात निर्माण झाली आहे. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, देशात सध्या अनेक बाबींबाबत वेगवेगळे मतप्रवाह बनत आहेत. त्यामुळे वातावरण बिघडत आहे. याचा तरुणांनी विचार केला पाहिजे.कॉ. नजुबाई गावित म्हणाल्या की, ज्यावेळी मला हा पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी मला खूप आनंद झाला. कारण इंदुताई यांनी आयुष्यभर त्याग केला आहे. त्यांच्या याच त्यागाने मी भारावून गेले आहे. या पुरस्काराने मला आणखी मोठे बळ मिळाले असून येथून पुढेही माझे काम मी करतच राहणार आहे.यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अॅड. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुमेध माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.उपेक्षित घटकांना न्यायासाठी संघर्षआ. ह. साळुंखे म्हणाले की, इंदुतार्इंनी आपल्या कार्याने या भागाचे नाव मोठे केले. बाबूजींच्या निधनानंतरही त्यांनी मोठ्या धाडसाने आपल्या मुलाला सामाजिक चळवळीत पुढे आणले. त्यांनी आपल्या जीवनात खरोखरच क्रांती केली असून अनेक उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. डॉ. भारत पाटणकरांनी त्यांचा लढा मोठ्या ताकदीने सुरू ठेवला आहे.कासेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारी नजुबाई गावित यांना ‘इंदुताई पाटणकर स्मृती’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याहस्ते देण्यात आला. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. भारत पाटणकर उपस्थित होते.