सांगली : तुरीवरील वांझ हा रोग पीजन पी स्टरीलीटी मोझॅक वायरस या विषाणूमुळे होतो. तुरीच्या पानावर गोलाकार पिवळे ठिपके पडतात. तुरीच्या रोपाची वाढ खुंटते आणि पानांचा आकार लहान होणे अशी लक्षणे आहेत. या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास शंभर टक्के पिकाचे नुकसान होऊ शकते, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
वांझ रोगामुळे पुर्णत: अथवा अंशत: फुलधारणा होत नाही. त्यामुळे झाडावरील शेंगांची संख्या घटते. वांझ रोगाच्या प्रादुर्भाव पेरणीनंतर ४० दिवसांच्या आत झाल्यास पिकाचे शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता असते. प्रादुर्भाव झाल्यास नुकसानीची पातळी कमी अधिक प्रमाणात दिसून येते. रोगट झाडे, भुरी रोगास सहजासहजी बळी पडतात. यामुळे कृषी विभागाकडील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी औषध फवारणी करावी, असे आवाहनही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.