शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

‘म्हैसाळ’च्या पाण्याचे राजकारण नको : अजितराव घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:00 AM

सांगली : कुचकामी ठरलेली शासकीय यंत्रणा व नियोजन नसल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न दरवर्षी ताणला जात आहे. पाणीपट्टी वसुलीचे योग्य नियोजन आवश्यक असताना पाणी टंचाईतून सोडले जाणार आहे, यासह इतर कारणे पुढे करून पाण्याचे राजकारण केले जात आहे. शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता म्हैसाळच्या पाण्यावरून सुरू असलेला राजकीय ...

ठळक मुद्देआवर्तन सुरू न झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांचे तीनशे कोटींवर नुकसान

सांगली : कुचकामी ठरलेली शासकीय यंत्रणा व नियोजन नसल्याने म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न दरवर्षी ताणला जात आहे. पाणीपट्टी वसुलीचे योग्य नियोजन आवश्यक असताना पाणी टंचाईतून सोडले जाणार आहे, यासह इतर कारणे पुढे करून पाण्याचे राजकारण केले जात आहे. शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेता म्हैसाळच्या पाण्यावरून सुरू असलेला राजकीय खेळ थांबवा, असा घणाघात माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत येथे केला.

दरम्यान, टंचाईतूनच पैसे भरून पाणी सोडायचे होते तर जानेवारी महिन्यातच पिकांना गरज असताना पाणी का सोडले नाही? असा सवाल करत लाभक्षेत्रातील शेतीचे तीनशे कोटींवर नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन लांबल्याने लाभक्षेत्रातील शेतीची झालेली अवस्था व पाणीवापर संस्थांचा पुढाकार याविषयासह म्हैसाळच्या आवर्तनाच्या अडचणीवर घोरपडे यांनी शुक्रवारी मत मांडले.

घोरपडे म्हणाले की, योजना सुरू होऊन पंधरा वर्षांचा कालावधी झाला, मात्र अद्यापही कारभारात काटेकोरपणा दिसत नाही. ‘म्हैसाळ’नंतर सुरू झालेल्या टेंभूचे आवर्तन योग्यरितीने सुरू आहे. लाभक्षेत्रातील द्राक्ष व उसाचे पिक अडचणीत असल्याने पाणी सोडणे आवश्यक असताना शेतकºयांना पाणीपट्टी भरण्यापासून रोखले जात आहे. याचसाठी पुढाकार घेऊन मिरज व कवठेमहांकाळ येथे बैठका घेत शेतकºयांना एकरी दोन हजार रूपये भरण्याचे आवाहन केले आहे.

त्यास प्रतिसादही चांगला असताना आता टंचाईतून थकबाकी भरणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकºयांनीही हात आखडता घेतल्याने त्याचा परिणाम शेतीवर झाला आहे.वास्तविक कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील पाण्याची स्थिती पाहता जानेवारी महिन्यातच पाणी सोडणे आवश्यक आहे. मात्र, मार्च महिना सुरू झाला तरी अजूनही शेतकºयांना झुलवण्यात येत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. याउलट पाणीवापर संस्था स्थापन करून पाण्याचे नियोजन शेतकºयांच्या हातात दिले तर वारंवार निर्माण होणाºया म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासह अनेक प्रश्न सुटणार आहेत. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले उपस्थित होते.तीन संस्थांचे ल्ािंकिंग आवश्यकपाणी नसल्याने शेतीचे नुकसानम्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालवाम्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा लाभ दुष्काळी भागाला जास्तीत जास्त मिळणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती करून पाणीवापर संस्था निर्माण करून आवर्तनाचे नियोजन केले तर शासनाच्या भरवशावर शेतकरी थांबणार नाही. त्यासाठी पाणी वापर संस्था, विकास सोसायट्या व मध्यवर्ती बॅँक यांचे लिंकिंग करावे जेणेकरून भविष्यातील वसुलीची प्रक्रिया सुकर होणार आहे.घोरपडे म्हणाले की, पिकांना वेळेत पाणी न मिळाल्याने दुष्काळी भागातील शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. उसाची नवीन लागवड थांबली आहे. सध्या विक्रीसाठी तयार असलेल्या द्राक्षांना पाणी मिळत नसल्याने मणी मऊ पडत आहेत. परिणामी द्राक्षांचे ६० ते ७० हजार हेक्टरवरील क्षेत्र धोक्यात आले आहे. असे असतानाही पाणी सोडण्याचे नियोजन होत नाही हे दुर्दैवाचे आहे.पाटबंधारे विभागाचे अधिकाºयांकडून योग्य नियोजन होत नाही. त्यामुळे यावर पर्याय आवश्यक आहे. शेतकºयांकडून वसुलीसाठी यंत्रणा तयार करावी तसेच प्रकल्पखर्च वाढवून सौरऊर्जेवर योजना चालवावी. यासाठी थोडीफार पाणीपट्टी वाढविली तरी त्यास शेतकरी मदतच करतील. फक्त पाणी मिळणार का ही शेतकºयांची भीती घालविण्याची गरज असल्याचेही घोरपडे यांनी सांगितले.