लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लग्न म्हणजे दोन जिवांचे, दोन कुटुंबांचे मिलन. मात्र, समाजातील असेही काहीजण आहेत की त्यांना या पवित्र बंधनातही व्यवहार करावासा वाटतो. त्यामुळे जुळत आलेली बंधनेेही तुटल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे हुंड्यासाठी होणारा हट्ट आणि पिळवणूक पाहता, हुंडा नेमका मुले घेतात की आई-वडिलांनाच त्यात रस असतो? हा प्रश्नच आहे. तरीही समाजातील बदल लक्षात घेता, अनेक तरुण स्वत:हूनच हुंडा घेण्यास नकार देत असल्याचेही चित्र आहे.
विवाह झाल्यानंतर काही महिने सुरळीत संसार झाल्यानंतर कुरबूर सुरू होते. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो लग्नात केलेल्या मानपानाचा. यातून अनेकदा विवाहिता सासरहून माहेरी येऊन राहतात. हा विसंवाद वाढतच जात यातून घटस्फोटापर्यंतही प्रकरणे जातात. त्यामुळे हुंडा आणि त्यासाठी विवाहितांचा होणारा छळ हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
चौकट
हुंडाविरोधी कायदा काय?
शासनाने हुंडा घेणे व त्यासाठी मुलींच्या छळ करण्यास प्रतिबंध व्हावा, यासाठी विशेष कायदा केला आहे. या कायद्यानुसार विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल आरोपींवर कडक कारवाई केली जाते. यामुळे पीडितांना चांगला आधार मिळाला आहे.
चाैकट
९१ केसेस
जिल्ह्यातील तुलनेने हुंड्यासाठी छळाच्या घटनांचे प्रमाण कमी आहे. तरीही गेल्या आठ महिन्यांत ९१ विवाहितांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत, तर छळ आणि मारहाणीच्या ११ घटना घडल्या आहेत.
चौकट
कोट
मुलांच्या मनात काय?
केरळ विद्यापीठाने आता हुंडा घेतल्यास पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर समाजातील ही अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी आता समाजातीलच घटकांनी पुढाकार घ्यायला हवा.
- अनिरुध्द ऐनापुरे
कोट
आपल्या मुलावर, त्याच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास असलेले पालक असे कधीही करत नाहीत. जे करतात त्यांचा हेतू चांगला कधीच नसतो; पण हुंडा घेऊन लग्न करणे हे मान्य नाही.
- महेश देशमुख
चौकट
मुलींच्या मनात काय?
हुंडा घेऊन लग्न करणे हे मुळात चुकीचे आहे. आता सर्व शिक्षित होत आहेत. अशा स्थितीतही हुंडा घेणे व त्यासाठी दबाव टाकणे चुकीचे वाटते.
- वैष्णवी जाधव
कोट
मुलगा कितीही मोठ्या पदावर का असेना, हुंड्यासाठी आई-वडिलांना त्रास देणाऱ्याशी लग्नास कधीही होकार देणार नाही. उलट त्याने कोणतीही अपेक्षा ठेवू नये
- सपना ढवळे
चौकट
मुला-मुलींच्या पालकांना काय वाटते?
पूर्वी हुंड्यासाठी अगदी ठरलेले विवाह मोडले जात होते. आता अशी परिस्थिती नाही. सर्व सुशिक्षित झाो आहेत.
- सीताराम ढवळे
कोट
पूर्वी लग्न करून येताना जो अनुभव आला, त्यामुळे पुन्हा हुंड्याची मागणी होते; पण आता हे प्रकार कमी झाले आहेत. तरीही कोणी हुंडा घेत असल्यास चुकीचे आहे.
- सोनाली पवार