शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

परदेशातून आलेले डॉक्टर नोंदणी क्रमांकाअभावी ‘सलाईन’वर; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेबद्दल नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:43 PM

सांगली : परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या महाराष्ट्रातील डॉक्टरांना निकालानंतरही अनेक महिने नोंदणी क्रमांकासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ...

सांगली : परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या महाराष्ट्रातील डॉक्टरांना निकालानंतरही अनेक महिने नोंदणी क्रमांकासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेऊ पाहणाऱ्या किंवा प्रॅक्टिस करण्याचे नियोजन केलेल्या डॉक्टरांसमोर अडचणींचा बांध निर्माण झाला आहे.परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात आलेल्या व येथील परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई) उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना संबंधित राज्यातील परिषदेमार्फत सुरुवातीला तात्पुरता व नंतर कायम नोंदणी क्रमांक दिला जातो. याआधारे संबंधित डॉक्टर स्थानिकांना सेवा देऊ शकतात, नोकरी करु शकतात किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात.महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने चार महिन्यांपासून अशा मुलांना नोंदणी क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे यामधील काही मुले जी पदव्युत्तर परीक्षा पास झालेली आहेत परंतु त्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे तसेच काही मुलांना नोकरी व वैद्यकीय सेवा द्यायची आहे अशा मुलांना कायमचा नोंदणी क्रमांक न मिळाल्यामुळे अडचणी येत आहेत.भारतातील अनेक विद्यार्थी दरवर्षी रशिया, अझर बैजान, कझाकिस्तान, किर्गीस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन, रुमानिया, फिलीपाईन्स, जॉर्जिया या देशांत वैद्यकीय पदवीचे (एम.बी.बी.एस.) शिक्षण घेण्यासाठी जातात. तेथून शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर भारतात थेट सेवा करण्यास मान्यता नाही. त्यासाठी आधी पात्रता परीक्षा द्यावी लागते आणि तिची काठीण्य पातळी खूप अधिक आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल सातत्याने कमी लागला आहे.यावर्षी ३४ हजार ६०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी केवळ ७ हजार २३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण डॉक्टरांमधील जे महाराष्ट्रातील आहेत त्यांना अद्याप नोंदणी क्रमांक न मिळाल्याने त्यांचा पुढील वैद्यकीय प्रवास थांबला आहे.

अशी असते नोंदणी क्रमांकाची प्रक्रियाप्रथमता मिळालेला नोंदणी क्रमांक हा तात्पुरता असतो आणि त्यानंतर संबंधित डॉक्टरांना भारतात इंटर्नशिप करावी लागते. ती पूर्ण झाल्यानंतर या मुलांना कायमचा नोंदणी क्रमांक मिळतो. त्यानंतर त्यांचा भारतातील पदव्युत्तर शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सेवेचा मार्ग सुकर होतो.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर