शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

‘सिव्हिल’च्या निवासी डॉक्टरांना दोन महिन्यांपासून पगार नाही, प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 3:49 PM

निवासी डॉक्टर्स व आंतरवासिता डॉक्टरांच्या वेतनाची अनियमितता संपूर्ण राज्यात सुरू आहे

मिरज : सांगली व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पावणेदोनशे निवासी व दोनशे आंतरवासिता डाॅक्टरांना गेले दोन महिने पगार मिळालेला नाही. शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने जून व जुलै या दोन महिन्यांचे वेतन अद्याप थकल्याने प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांमध्ये नाराजी आहे.सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात चारशे प्रशिक्षणार्थी डाॅक्टर कार्यरत आहेत. कोरोना साथीच्या काळात या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्णसेवा केल्याने रुग्णांना मोठा आधार मिळाला होता. एमबीबीएसनंतर तीन वर्षे एमडी या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या निवासी डाॅक्टरांना दरमहा ६५ हजार व एमबीबीएसनंतर एक वर्षाचे वैद्यकीय प्रशिक्षण घेणाऱ्या आंतरवासिता विद्यार्थ्यांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना गेले वर्षभर वेतन अनियमित मिळत आहे. यावर्षी जून व जुलै या दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा करणाऱ्या या निवासी डॉक्टरांना वेतन मिळालेले नाही.निवासी डॉक्टर्स व आंतरवासिता डॉक्टरांच्या वेतनाची अनियमितता संपूर्ण राज्यात सुरू आहे. यामुळे आधीच कामाच्या तणावाखाली असलेले निवासी डॉक्टर्स आर्थिक तणावाखाली आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील स्थायी डाॅक्टर व प्राध्यापकांना नियमित वेतन मिळते. प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरांची पदे अस्थायी असून, वेतनासाठी शिक्षण सोडून जाऊ शकत नसल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू असल्याची निवासी डाॅक्टरांची प्रतिक्रिया आहे. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे निवासी डॉक्टरांमध्ये रोष आहे. आर्थिक अडचणीमुळे कामावर परिणाम होत असल्याने शासनाने अनुदानाची व्यवस्था करून नियमित वेतन देण्याची निवासी डॉक्टरांची मागणी आहे.दोन महिन्यांनंतर एकच महिन्याचे विद्यावेतनगेले वर्षभर दोन महिन्यांनंतर केवळ एकच महिन्याचे विद्यावेतन देण्यात येत आहे. बहुसंख्य प्रशिक्षणार्थी डाॅक्टर परराज्यातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले असून, दोन महिने झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात एकदा विद्यावेतन मिळत असल्याने निवासी डॉक्टर आर्थिक अडचणीत आहेत. आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जून, जुलै महिन्याच्या विद्यावेतनाची प्रतीक्षा सुरू आहे.

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर