शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

‘डॉल्बी’ लावाल, तर ‘करिअर’ला मुकाल!

By admin | Published: September 03, 2016 11:54 PM

विश्वास नांगरे-पाटील : अनंत चतुर्दशीला रात्री बाराच्या आत मूर्ती विसर्जन करण्याची सूचना

सांगली : ‘नो डॉल्बी’चा नारा दीड महिन्यापूर्वी दिला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातूनही कोणी डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल. चार-पाच तासांच्या विसर्जन मिरवणुकीत ‘डॉल्बी’ लावून करिअर खराब करू नका. गुन्हा दाखल झाला तर भविष्यात साधी शिपायाची नोकरीही लागणार नाही, असा सल्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला. अनंत चतुर्दशीला बारा वाजण्याच्या आत गणेशमूर्तींचे विसर्जन करा, असेही त्यांनी बजावले.सांगली पोलिस दलाच्यावतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळ व शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नांगरे-पाटील बोलत होते. आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हांकारे, महापालिका स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.नांगरे-पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सव म्हणजे समाजप्रबोधनाची चळवळ बनायला हवी होती, पण तसे घडले नाही. उत्सवाचे स्वरूपच बदलत गेले. आजच्या पिढीने तरी उत्सवाला समाजप्रबोधनाचे स्वरूप आणावे. ‘डॉल्बी’चे फायदे-तोटे आपल्याला माहीत आहेत. तरीही आपण त्यालाच का पसंती देतो? मी पुण्यात असताना तीन रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. तत्पूर्वी तेथे जाऊन सर्वेक्षण केले होते. मीही ‘डॉल्बी’च्या तालावर नृत्य केले होते; पण नशा केली नव्हती. पार्टीत नृत्य करणारे नशा केलेले असतात. ‘डॉल्बी’च्या तालावर आपण काय करतो, याचे त्यांना भान नसते. ‘डॉल्बी’च्या आवाजाने भूकंप झाल्यासारखे वाटते. १५ ते २० मिनिटात कानाचे पडदे फाटतात; पण पार्टीतील नशाबाजांवर त्याचा काही फरक पडत नव्हता. गणेशोत्सव मिरवणुकीतही अनेक ठिकाणी अशीच स्थिती असते. मिरवणूक पाहणाऱ्या लोकांना ‘डॉल्बी’च्या आवाजाचा प्रचंड त्रास होतोे. नांगरे-पाटील म्हणाले की, मी सांगली जिल्ह्यातील कोकरुडचा आहे. त्यामुळे उत्सवाला गालबोट लावू नका. शांततेत उत्सव साजरा करा. जातीय व धार्मिक तणाव निर्माण करू नका. उत्सवातील वर्गणीचा उपयोग विधायक कामासाठी करा. पोलिसांच्या मदतीशिवाय उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास वेळ मिळेल. सुरक्षेसाठी मंडळांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. आ. सुधीर गाडगीळ यांनी शासनाच्या देखावे स्पर्धेत मंडळांनी भाग घेऊन रोख बक्षीस घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, ‘इको फ्रेंडली’ उत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जलयुक्त शिवारास चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही मंडळांनी ‘डॉल्बी’वर होणारा खर्च जलयुक्त शिवारसाठी दिला आहे. (प्रतिनिधी)मुंबईतील हल्ला : दक्षता घेतली होती...नांगरे-पाटील म्हणाले की, मुंबईवर २६/११ चा हल्ला होण्यापूर्वी दीड महिना अगोदर ‘ताज’ हॉटेलबाहेर मी स्वत: पाच शस्त्रधारी पोलिसांचा पहारा ठेवला होता. त्यानंतर मी रजेवर गेलो होतो. धुळ्याला दंगल झाल्यानंतर तिथे पोलिस बंदोबस्तासाठी एका अधिकाऱ्याने ताज हॉटेलबाहेरील पाच शस्त्रधारी पोलिसांचा पहारा तिकडे पाठविला. हा पहारा कायमस्वरूपी राहिला असता, तर २६/११ चे चित्र वेगळे झाले असते. दहशतवादी हॉटेलमध्ये घुसलेच नसते. आमदाराचा मृत्यूनांगरे-पाटील म्हणाले की, नांदेडला असताना गणेशोत्सव मिरवणुकीत तेथील ४५ वर्षीय ‘लोकप्रिय’ आमदाराने ‘डॉल्बी’च्या तालावर नृत्य केले होते. मिरणुकीतील अन्य कार्यकर्तेही नृत्यात मग्न होते. नृत्य करतानाच हे आमदार खाली कोसळले. ही बाब कुणाला समजलीच नाही. बऱ्याच वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला. आमदारास रुग्णालयात दाखल केले; पण तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना ‘डॉल्बी’चा आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला पाच लाख लोक आले होते.3१२६९ मंडळांचा संकल्प जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे म्हणाले की, दीड महिन्यापासून पोलिसांकडून ‘नो डॉल्बी’चा नारा सुरू आहे. जिल्ह्यातील १२६९ गणेश मंडळांनी ‘डॉल्बी’ लावणार नाही, असे लेखी लिहून दिले आहे. जी गणेश मंडळे चांगल्याप्रकारे उत्सव साजरा करतील, त्यांना पोलिस ठाणे स्तरावर रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. जातीय सलोखा योजनेंतर्गत ही बक्षिसे दिली जाणार आहेत. ‘विघ्नहर्ता’ असे या पुरस्काराचे नाव आहे.