शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

काळू-बाळूच्या तमाशाला नवसाचं देणं : परंपरेची हलगी कडाडणार

By admin | Published: April 17, 2016 11:00 PM

कवलापूर यात्रा कमिटीचा पुढाकार; कलाकारांची जुळवाजुळव सुरू--लोकमत विशेष

सचिन लाड-- सांगली--विनोदी भूमिका आणि अभिनयाने साऱ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारा अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा यंदा दुष्काळामुळे बंद पडला. पण तमाशाची जन्मभूमी असलेल्या कवलापूर (ता. मिरज) येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेत त्यांची हलगी पुन्हा कडाडणार आहे. यात्रा कमिटीच्या पुढाकारामुळे बंद पडलेल्या या तमाशाला नवसाचं देणं लाभलं आहे. तमाशाचा सर्व खर्च यात्रा कमिटीने उचलला आहे. त्यानुसार कलाकारांची जुळवाजुळव व तमाशाची रंगीत तालीमही सुरु केली आहे. काळू-बाळू यांचे आजोबा सातू-हिरु यांनी तमाशाचा हा फड सुरु केला. त्यांची मुले शिवा-संभा यांनीही ही कला पुढे नेली. तमाशाची कला जोपासण्यासाठी ‘काळू-बाळू’ची चौथी पिढीही यातच उतरली. प्रकृतीअस्वास्थ्यामुळे दोन वर्षाच्या अंतराने ‘काळू-बाळू’ची जोडी पडद्याआड गेली. त्यांच्या पाचव्या पिढीनेही पुढे हीच कला जोपासली. तब्बल ५५ वर्षे तमाशा हेच दैवत मानून सांगली जिल्हा आणि कवलापूरचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारा हा तमाशा, गेल्या दोन वर्षापासून आर्थिक संकटामुळे अडचणीत आहे. प्रत्येकवर्षी विजयादशमीला हा फड बाहेर पडतो. तेथून ते मे महिन्यात अक्षय्यतृतीयेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सव्वादोनशे प्रयोग केले जातात. पण यंदा राज्यात दुष्काळ पडला आहे. त्यातच आर्थिक दुष्टचक्रात अडकलेला तमाशा चालणार नाही, असा विचार करुन यंदा फड बंद ठेवला आहे. चैत्र महिन्यात हनुमान जयंतीला कवलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेस प्रारंभ होतो. यंदा प्रतिकूल परिस्थितीमुळे तमाशाचा फड सुरु करता आला नाही. तरीही गावातील सिद्धेश्वर मंदिरात देवासाठी नवसाचा खेळ करण्याच्या निमित्ताने तमाशा पुन्हा कवलापूरच्या मातीत बहरणार आहे. तमाशाचा प्रयोग होणार असल्याने यातील कलाकारांसह गावकऱ्यांमध्येही याचा आनंद दिसून येत आहे.यात्रेच्या अभिमानाचा भागगुढीपाडव्याला यात्रा कमिटीची बैठक झाली. सरपंच प्रकाश माळी, उपसरपंच सचिन पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक निवासबापू पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे अध्यक्ष भानुदास पाटील, ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, माजी सरपंच जवान मोहिते, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेशअण्णा पाटील, राजू भगाटे आदी उपस्थित होते. यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. यात्रेच्या चौथ्या व पाचव्यादिवशी गेल्या चार दशकाहून अधिक काळ ‘काळू-बाळू’ यांचा तमाशा होतो. तमाशा कलावंतही यादिवशी अन्य कोणतीही ‘सुपारी’ घेत नाहीत. पण यंदा त्यांचा तमाशा बंद असल्याने, करायचे काय? असा प्रश्न पडला. त्यावेळी यात्रा कमिटीने, गावाचा तमाशा असताना बाहेरचा तमाशा आणायचा नाही, असा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी ‘काळू-बाळू’ तमाशाचे संचालक संपत खाडे यांची भेट घेतली व तुमचा तमाशा सादर करा, अशी सूचना केली. खाडे यांनी कलाकारांची व आर्थिक समस्या मांडली. तरीही कमिटीने खर्चाची सर्व जबाबदारी उचलली. खाडेही तयार झाले. त्यामुळे तमाशाची राज्यातील परंपरा खंडित झाली असली तरी, कवलापूरच्या यात्रेतील परंपरा अखंडित राहिली आहे. पन्नासभर कलाकार : सादरीकरणाचा लवाजमासंपत खाडे यांनी गेल्या आठवड्यात कलाकारांची जुळवाजुळव केली. यासाठी त्यांना सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात फिरावे लागले. दोन दिवसांसाठी पगारावर पन्नास कलाकार आणले जाणार आहेत. याशिवाय त्यांच्या घरचे दहा कलाकार आहेत. या कलाकारांचा पगार, जेवण, जनरेटरची व्यवस्था यात्रा कमिटी करणार आहे. फडाकडे वाहन, स्टेज, ध्वनियंत्रणा व विद्युत रोषणाईची व्यवस्था आहे. फडाचे चार ट्रक आहेत. साहित्य नेण्यासाठी किमान तीन ट्रक लागतात. त्यामुळे या ट्रकचीही दुरुस्ती करुन आणण्यात आली आहे. बुधगावकरांचे साकडेहनुमान जयंतीला बुधगावच्या सिद्धेश्वर यात्रेलाही प्रारंभ होतो. ‘काळू-बाळू’चा तमाशा कवलापूरच्या यात्रेत होणार असल्याचे बुधगावच्या यात्रा कमिटीला समजले. कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी संपत खाडे यांची भेट घेऊन बुधगावलाही तमाशा करण्याची विनंती केली. पण खाडे यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले. दुष्काळामुळे यंदा तमाशा सुरु ठेवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे फड बंद ठेवला. कवलापूर आमची जन्मभूमी आहे. येथे यात्रेत तमाशा करण्याची कित्येक वर्षांची परंपरा आहे. यात एक आमचा नवसाचा खेळ असतो. ही परंपरा खंडित होते की काय, अशी भीती होती. पण यात्रा कमिटी मदतीला धावली. त्यामुळे आम्ही केवळ यात्रेपुरते दोन दिवस खेळ करणार आहोत. - संपत खाडे, संचालक, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा, कवलापूर