शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
3
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
4
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
5
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
6
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
7
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
8
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
9
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
10
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
11
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
12
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
13
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
14
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
15
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
16
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
17
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
18
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
19
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

गर्भवतीला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका, अंनिस आणि स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:44 PM

ग्रहणकाळात गर्भवतीला अंधाऱ्या खोलीत बसवून ठेवणे, तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

सांगली : ऐन दिवाळीत मंगळवारी (दि. २५) सायंकाळी साडेचार वाजता खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्याचा ३६ टक्के भाग झाकला जाणार आहे. हे ग्रहण अशुभ नसल्याने गरोदर महिलांनी पाळण्याची गरज नाही अशी स्पष्टोक्ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. सांगली मिरज स्रीरोगतज्ज्ञ संघटनेनेही दुजोरा दिला आहे.संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, ग्रहणासारख्या एका सुंदर खगोलीय घटनेला अशुभ मानणे चुकीचे आहे. ग्रहणकाळात कोणतीही हानिकारक किरणे निघत नाहीत. अन्न, पाणी दूषित होत नाही. ग्रहणकाळात गर्भवतीला अंधाऱ्या खोलीत बसवून ठेवणे, तिच्या व बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. ग्रहणात गर्भवतीने काम केल्यास बाळाचे ओठ फाटतात, याला कोणताही वैद्यकीय आधार नाही.

जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गर्भामध्ये व्यंगमानवी गर्भाचा विकास आठव्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालेला असतो. अनुवंशिकतेने, गुणसूत्रांच्या दोषांमुळे, चुकीची औषधे खाल्ल्याने किंवा ब जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गर्भामध्ये व्यंग तयार होतात. तिसऱ्या व पाचव्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये काही दोष दिसले नाहीत, तर घाबरण्याचे कारण नाही. त्यामुळे गर्भवतीला ग्रहण पाळण्याची सक्ती करू नका, असे आवाहन अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मोनिका कल्लोळी, सचिव डॉ. कांचन जोशी यांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीsolar eclipseसूर्यग्रहणPregnancyप्रेग्नंसी