शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कर्ज सवलतीवर दाटले त्रुटींचे ढग

By admin | Published: March 14, 2016 11:08 PM

जिल्हा बँक : जुन्या थकबाकीदारांना लाभ मिळणार नाही

सांगली : जिल्ह्यातील ३६३ टंचाईग्रस्त गावांमधील पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी या सवलतींवर निर्णयातील त्रुटींचे ढग दाटले आहेत. जुन्या थकबादीरांना लाभ न मिळण्याबरोबरच पुनर्गठनातील व्याजाच्या अडचणींमुळे सवलतीच्या योजनेवर पाणी पडण्याची चिन्हे आहेत. सांगली जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये गत जिरायत पिकांना ३२५ कोटींच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता शासनाच्या आदेशानुसार कर्जाच्या पुनर्गठनाचा लाभ लागू झाला आहे. याशिवाय जिल्हा बॅँकेला कर्जाची वसुली थांबविण्याचे आदेशही दिले आहेत. या योजनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षातील कर्जदार शेतकऱ्यांचाच समावेश होणार आहे. त्यापूर्वीच्या वर्षामध्येही दुष्काळ होता. तरीही जुन्या थकबाकीदारांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय कर्जपुनर्गठन करताना व्याजाची टक्केवारी ६ वरून १३ टक्क्यांवर जाते. त्यामुळे यापूर्वीही गारपीट आणि दुष्काळी सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जाच्या पुनर्गठनासाठी टंचाईग्रस्त गावांमधून प्रतिसाद मिळाला नव्हता. कर्जाच्या पुनर्गठनामुळे शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नाही. वेळेत कर्ज परतफेड केल्यानंतर व्याजात मिळणारी सवलत चांगली असल्याने पुनर्गठनाऐवजी टंचाईतही तजवीज करून शेतकरी कर्ज भरत असतात. कर्जवसुलीला स्थगिती आणि पुनर्गठनाचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार आहे. दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतर अशीच सवलत शासनाने लागू केली होती. त्यावेळी जिल्ह्यातून केवळ १२ ते १५ शेतकऱ्यांनीच पुनर्गठनाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सवलतीच्या या निर्णयात असलेल्या त्रुटी दूर होण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवलतींच्या नावाखाली असे कुचकामी आदेश निघत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय लाभार्थी गावेमिरज : ४१कवठेमहांकाळ : ६०जत : ५३तासगाव : ६९कडेगाव : ३९विटा : ६७वाळवा : ८आटपाडी : २६बागायतीला आदेशाची अटजिरायत पिकांसाठी ही योजना लागू होत असताना, बागायतदारांना सवलतीसाठी महसूल अधिकाऱ्याच्या दाखल्याची अट राहणार आहे. तलाठी किंवा संबंधित तहसीलदाराने नुकसानीबाबतचा दाखला दिल्यानंतरच त्यांना सवलतीला लाभ मिळणार आहे. कर्जाच्या वाटपाचा विचार केला, तर बागायत पिकांनाही मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे बागायतदारांना अधिकाऱ्यांचा दाखला सादर करावा लागणार आहे.