मिरज : हैद्राबाद-मुंबईसह केवळ मोठ्या शहरात असलेली पोटविकारावरील अद्ययावत उपचारपद्धती मिरजेत पोटविकार तज्ज्ञ डाॅ. सुजय कुलकर्णी यांच्याकडे उपलब्ध झाली आहे. डाॅ. सुजय कुलकर्णी यांनी शस्त्रक्रियेशिवाय स्वादुपिंडातील टाकाऊ द्रवाचा निचरा करून रुग्णाला दिलासा दिला.
पॅनक्रिएटिकवाल्ड ऑफ एन्डोस्कोपिकनेक्रोसिस (डब्ल्यूओपीएन) पद्धतीने पोटातील भिंतीला छिद्र पाडून तेथे मेटल स्टँट छोट्या पिशवीत ठेऊन तेथील टाकाऊ निचऱ्याचे पोटात संकलन करून बाहेर काढण्यात आले. या प्रक्रियेने स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया टाळण्यात येऊन केवळ एका तासातच रुग्णाची पोटाची तक्रार दूर झाली. एआयजी हैदराबाद येथे अशा प्रकारचे एन्डोस्कोपिक उपचार करण्यात येतात. मिरज-सांगली परिसरात डाॅ. सुजय कुलकर्णी यांनी प्रथमच ही उपचारपद्धती उपलब्ध केल्याने पोटविकार असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा धोका टाळून उपचार घेता येणे शक्य झाले आहे.