शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

पाण्याविना १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र वंचित-ताकारी योजनेचे चित्र : १० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 11:52 PM

कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे.

ठळक मुद्देनिम्म्याहून अधिक क्षेत्र कोरडे

- अतुल जाधव ।देवराष्ट : कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला वरदायिनी ठरलेल्या ताकारी योजनेचे १७ हजार हेक्टर लाभक्षेत्र अजूनही पाण्याविना वंचित राहिले आहे. ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्राची वाढ ही कासवगतीने असल्यामुळे शेतकºयांचे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याविना वंचित राहत आहे. ३४ वर्षांत योजनेचा आराखडा शेकडोपटीने वाढूनही निम्मे लाभक्षेत्रही ओलिताखाली येऊ शकलेले नाही.

ताकारी उपसा सिंचन योजनेतून सहा तालुक्यातील २७ हजार ४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वास्तविक योजना सुरू झाल्यापासून ३४ वर्षांच्या काळात यापैकी इंच न इंच जमीन ओलिताखाली यावयास हवी होती; मात्र राज्यकर्त्यांसह प्रशासनाची इच्छाशक्ती व निधीची कमतरता यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही योजनेचे काम आजही अपूर्ण राहिले आहे.

ताकारी योजनेचे पाणी २००२-०३ ला कडेगाव तालुक्यात दाखल झाले. तेव्हापासून मागील दोन वर्षांपर्यंत या योजनेवर स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभाग कार्यरत नव्हता. यामुळे या विभागाची जबाबदारी योजनेच्या बांधकाम विभागावरच होती. अपुºया कर्मचारी संख्येमुळे बांधकाम विभागाला तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे सदोष मोजणीमुळे लाभक्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत नव्हते.ताकारी योजनेसाठी स्वतंत्र सिंंचन व्यवस्थापन विभागाची निर्मिती झाल्यानंतर योजनेच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून लाभक्षेत्रात थोडीच वाढ झाल्याचे दिसत आहे.

यामुळे अजूनही लाभक्षेत्राची मोजणी सदोषच झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. तसेच २०१२-१३ व १३-१४ मधील ओलिताखाली आलेल्या लाभक्षेत्राचा विचार केल्यास मोठी तफावत पाहावयास मिळत आहे.ओलिताखाली आलेले क्षेत्र २०११-१२ मध्ये ५४४८ हेक्टर, १२-१३ मध्ये ६३४२, १३-१४ मध्ये ६४०० हेक्टर, तर १४-१५ मध्ये ७८१६ इतके झाले होते. १५-१६ मध्ये ७९३५ हेक्टर व १६-१७ मध्ये ९०७० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्याची नोंद आहे; तर १७-१८ मध्ये १०७६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे.योजनेचे लाभक्षेत्र असलेल्या कडेगाव, खानापूर, तासगाव, पलूस, वाळवा या तालुक्यातील लाभक्षेत्राचा अभ्यास केल्यास या भागात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. तसेच भाजीपाला व द्राक्ष, डाळिंब यांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील उसाचे गाळप व ऊस पिकाची नोंद लक्षात घेता, योजनेचे ओलिताखाली आलेले लाभक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र योजनेच्या लाभक्षेत्राची मोजणी सदोष होत असल्याने व यामध्ये काही अडचणी येत असल्याने योजनेला काही कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.५ वर्षात ओलिताखालील क्षेत्र : ३ हजार हेक्टरने वाढलेताकारी योजनेचे पाणी जिथपर्यंत पोहोचले आहे, तिथपर्यंतचे क्षेत्र १३८५२ हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात आले आहे. त्यापैकी १०७६५ हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जात आहे. २०१४-१५ मध्ये ७८१६ हेक्टर ओलिताखालील क्षेत्रात ३ हजार हेक्टरने वाढ होऊन ते २०१८ पर्यंत १०७६५ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.