वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सध्या वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यात वाहन चालविण्याच्या आदर्श नियमावलींसह इतर नियमांच्या पालनाविषयक आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर काही मार्गांचा वापर सुरूही झाला आहे. त्यामुळे वाहनधारक वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांची सुरू असलेली कामे, रस्त्यावरील खड्डे, चुकीचे गतिरोधक यामुळेही अपघात घडत आहेत.
अपघात टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण यासह वाहनांच्या स्थितीबाबतही अनेक नियम आहेत मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात वाढत आहेत.
चौकट
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट
वाघवाडी चौक, पेठनाका, विठ्ठलवाडी, कामेरी, कासेगाव बसस्थानक, नेर्ले, येवलेवाडी फाटा, तांदूळवाडी फाटा, येडेनिपाणी फाटा, कणेगाव फाटा, येलूर फाटा, इटकरे फाटा, बोरगाव फाटा, कुची कॉर्नर, नागज फाटा, नागज महामार्ग चौक, बालाजी मंगल कार्यालय पंढरपूर रोड, मिरज, डी मार्ट पंढरपूर रोड, मिरज, यल्लमा मंदिर ते भोसे फाटा, सांडगेवाडी बसस्थानक, पाचवा मैल, कॉलेज कॉर्नर, बनपुरी-खरसुंडी ते मिटकी, गणपती मंदिर जत, काेळगिरी बसस्थानक जत, चव्हाण वस्ती कुडनूर फाटा जत, घाडगे हॉस्पिटल ते शिवशंभो चौक,सांगली, प्रांत कार्यालय पेठ नाका रस्ता इस्लामपूर, आष्टा नाका, आरआयटी कॉलेज, शिराळा-पेठ रस्ता, किसान चौक,मिरज, सांगली-तासगाव सिद्धेश्वर मंदिर, लक्ष्मी फाटा,सांगली.
चौकट
२०२० मधील अपघातांची संख्या
महिना अपघात
जानेवारी ६५
फेब्रुवारी ७९
मार्च ५६
एप्रिल १९
मे ४२
जून ३७
जुलै २५
ऑगस्ट ४३
सप्टेंबर ३३
ऑक्टोबर ५२
नोव्हेंबर ६३
डिसेंबर ७४
चौकट
तालुकानिहाय ‘ब्लॅक स्पॉट’ची ठिकाणे
वाळवा १५
कवठेमहांकाळ ४
मिरज ६
पलूस २
कडेगाव १
तासगाव २
आटपाडी १
जत ३
शिराळा १
खानापूर १
चौकट
जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट ३६
२०२० मध्ये याठिकाणी झालेले अपघात ५
एकूण अपघातातील मृत्यू २६०
चौकट
अपघातांचे प्रमाण घटले तरीही खबरदारी आवश्यकच
गेल्या दोन वर्षांतील अपघातांचा आढावा घेतला तर एक हजार ३४४ रस्ते अपघात झाले आहेत. रस्त्याच्या स्थितीमुळेच हे अपघात झाले आहेत. कोरोना कालावधीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अपघातांचे प्रमाण घटले असले तरी खबरदारी घेणे आवश्यकच आहे.