आटपाडी : गेल्या ६० वर्षात पेरणीला सुद्धा पाऊस आला नाही, असं यंदा घडलंय. शेतात पीक न्हाई, प्यायला पाणी न्हाई, हाताला काम न्हाई, जनावरांना चारा न्हाई, अनेकांनी जगण्यासाठी गाव सोडलंय... डोक्यावरच्या कर्जानं जगणं कठीण झालंय... अशी दैना अनेक शेतकऱ्यांनी गुरुवारी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर मांडली.
आटपाडी तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, पशुधन व दुग्धविकास विभागाचे सहसंचालक एल. जी. टेंभुर्णे, चारा विशेषज्ज्ञ विजय ठाकरे यांच्या पथकाने भेट दिली. पात्रेवाडी, लेंगरेवाडी, मानेवाडी, माडगुळे, निंबवडे आणि मुढेवाडी या गावांतील शेतकºयांची भेट घेऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, पुणे विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, जि. प. सदस्य अरुण बालटे उपस्थित होते.
पाण्याअभावी जळालेली पिके, कोरड्या विहिरी, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांना आलेले दारिद्र्य, शेतकºयांंच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, इथे चारा नसल्याने मेंढपाळांनी कोकणात केलेले स्थलांतर, ऊस तोडणीसाठी गाव सोडलेल्यांची बंद घरे, कोरडे ओढे याची पथकाकडून पाहणी केली.
पथकातील अधिकाºयांनी थेट शेतकºयांशीच चर्चा केली. जनावरे किती आहेत, पाण्याची अवस्था काय आहे, सध्या काय व्यवस्था केलीय... असे प्रश्न विचारून अधिकाºयांनी शेतकºयांची परिस्थिती जाणून घेतल्या.लेंगरेवाडीत शेतकºयांकडून कर्जमाफीची मागणीकरगणी (ता. आटपाडी) : ‘साहेब, कोरड्या पडलेल्या विहिरी अन् चाºयाअभावी ओरडणाºया जनावरांच्या हंबरड्यानं काळजाचं पाणी होऊ लागलंय. पाऊस नाही, पेरलेलं उगवलंच नाही. आता खायचं काय? पेरणीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कस’?’ अशा शब्दात लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकºयांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर व्यथा मांडल्या. निसर्गाने मारले, आता शासनाने तरी मदत द्यावी, संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणीही शेतकºयांनी यावेळी केली. शासनाने संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय जगू शकणार नसल्याची खंत शेतकºयांनी व्यक्त केली.गदिमांचे गाव कोरडे!थोर साहित्यिक ग. दि. माडगूळ यांच्या माडगुळे या गावाला पथकाने भेट दिली. माडगूळकरांनी लिहिलेल्या कोरड्या ओढ्याच्या पात्रात जलसंधारणाचे चांगले काम झाले आहे. सरपंच संजय विभुते, मनोहर विभुते, हेमंत कुलकर्णी यांनी, ओढापात्र कोरडे पडले आहे, जनावरांसाठी चाºयाची व्यवस्था करावी अन्यथा जनावरे कत्तलखान्याकडे जातील, अशी भीती व्यक्त केली.टॅँकरने डाळिंबाला पाणी देतोय...लेंगरेवाडी येथे एक दिवसआड दोन हजार रुपये खर्चून एक टॅँकर पाणी विकत घेऊन डाळिंबाच्या बागेला देतोय. त्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, अशी कैफियत दुर्योधन विठोबा लेंगरे, धनाजी लेंगरे, हरिदास लेंगरे या शेतकºयांनी मांडली. दुष्काळामुळे ६० टक्के कुटुंबांनी जगण्यासाठी गाव सोडल्याचेही शेतकºयांनी सांगितले.
कोरड्या विहिरी, ओसाड माळरानआटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांतील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांना खाण्यासाठी चारा नसल्याने, दावणीला बांधलेली जनावरे हंबरडा फोडत आहेत. माळरानावर कुसळाशिवाय काहीच नसल्याने, येणाºया उन्हाळ्यात भयावह परिस्थिती उद्भवणार आहे. जनावरे जगविण्यासाठी शासनाने चारा, पाण्याची सोय न केल्यास, जनावरे कत्तलखान्याकडे जातील, अशी भीती शेतकºयांनी पाहणी पथकापुढे व्यक्त केली.लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे केंद्रीय पथकातील निती आयोगाचे संचालक सुभाषचंद्र मीना, एम. जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी खा. संजय पाटील, आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात केंद्रीय पथकासमोर शेतकºयांनी व्यथा मांडली.