वाळवा : एक रुपयासुध्दा कर्ज नसणारी, दीड टनात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रात दुसरी कोणतीही संस्था नसेल. म्हैस दुधाला तीन रुपये आणि गाय दुधाला रुपया रिबेट देणारी संस्थाही दुर्मिळच म्हणावी लागेल. वाळव्याचे मॉडेल जिल्ह्याने राबविले, तर समृध्दी येईल, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.हाळभाग-वाळवा येथील गुरुवर्य लालासाहेब पाटील दूध उत्पादक संस्था, राजारामबापू पाणीपुरवठा संस्था नं. १ आणि २, वाळवा पाणीपुरवठा संस्था नं. १, गुरुवर्य लालासाहेब पाटील पाणीपुरवठा संस्था यांच्यावतीने सभासदांना रिबेट, ठेव दीपावली कीट व बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते. जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक प्रशांत थोरात, राजारामबापू बँक संचालक बाळासाहेब थोरात, राजाराम थोरात,विश्वास धस, दूध संस्थाध्यक्ष विजय पाटील, जयकर गावडे, सचिन कुंभार, डॉ. सचिन मोहिते, भूपाल नवले, माणिक खंडागळे, जालिंदर थोरात प्रमुख उपस्थित होते.देशमुख म्हणाले की, सहकाराचे खरे वारसदार जयंत पाटीलच आहेत. पारदर्शी कारभार करणारा, प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला, संस्थेच्या माध्यमातून अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांना न्याय देणारा नेता अशी दिलीपतात्यांची ओळख आहे.दिलीपतात्या पाटील म्हणाले की, आमच्या सर्व संस्था कर्जमुक्त होऊन ७० ते ७५ लाख रुपये स्वभांडवल शिल्लक राहण्यात सभासद, संचालक व कर्मचारी यांचे योगदान आहे. पाणी आणि संस्था यांचे राजकारण येथे केले जात नाही.दूध संस्थाध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष भूपाल नवले यांनी प्रास्ताविक केले. राजारामबापू दूध संघाचे डॉ. सचिन मोहिते यांनी ६० रुपयात चारचाकी पशुवैद्यकीय सेवेची माहिती दिली. म्हैस दूधपुरवठा करणाऱ्या दिनकर पाटील (प्रथम), संजय नवले (द्वितीय), संग्राम माने (तृतीय), गाय दूधपुरवठा करणारे संजय नवले (तृतीय), संतोष खंडागळे (प्रथम) यांना मान्यवरांच्याहस्ते रिबेट, ठेव, दीपावली कीटस्, बक्षीस रोख रक्कम देण्यात आली. पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने प्रकाश थोरात, शशिकांत खंडागळे, बाळासाहेब तोडकर, आदिनाथ चौगुले, गुणधर नवले, बाबू पुजारी, वसंत कोले, धोंडिराम मेटकरी यांना दीपावली कीट देण्यात आले. यावेळी सभासद, ग्रामस्थ, संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)सभासदांचा गौरव म्हैस दूध पुरवठा करणाऱ्या दिनकर पाटील (प्रथम), संजय नवले (द्वितीय), संग्राम माने (तृतीय), गाय दूध पुरवठा करणारे संजय नवले (तृतीय), संतोष खंडागळे (प्रथम) यांना मान्यवरांच्याहस्ते रिबेट, ठेव, दीपावली कीटस्, बक्षीस रोख रक्कम देण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दीपावलीची भेट मिळाल्याने सभासदांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.
‘वाळवा मॉडेल’ आदर्श ठरेल
By admin | Published: November 05, 2015 10:56 PM