दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवीन शाखा शुभारंभ जयंत कडू-पाटील, सरव्यवस्थापक जे. जे. पाटील, विभाग प्रमुख शिवाजी पाटील, संचालक चंद्रकांत हाक्के, सभापती विकास हाक्के यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडला, यावेळी ते बोलत होते.
जिल्हा बँकेच्या या नवीन शाखेचा फायदा दुधेभावी, ढोलेवाडी, शिंदेवाडी, घोरपडी या गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे. ही शाखा अत्याधुनिक करण्यात आली आहे. या शाखेत इतर शाखेच्या मानाने जास्त ठेवी व व्यवसाय निश्चितच होईल, असे आश्वासन हाक्के यांनी दिले.
विकास हाक्के म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांना टेंंभूचे पाणी आले आहे, तसेच शिक्षणाचीही सोय झाली आहे. आता बँकेची गरज होती, ती आता सांगली बँकेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.
यावेळी सरपंच संगीता काटे, ग्रामसेवक स्वाती मस्के, राधाबाई हाक्के, भाऊसाहेब फोंंडे, दिनकर पाटील, दादासाहेब कोळेकर, कुमार पाटील, अविराज देशमुख, अवधूत पाटील, अनिल शिंदे, पृथ्वीराज फडतरे, ढालगावचे कुमार पाटील, भाऊसाहेब पाटील, सुभाष खांडेकर, दिलीप झुरे, सुरेश घागरे, पोपट धोकटे, शहाजी झुरे आदी उपस्थित होते.