शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

दुष्काळाची दाहकता वाढली- सांगली जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:57 PM

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली असून, ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन

ठळक मुद्दे७५ गावे, ४९९ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी

 सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढली असून, ७५ गावे आणि ४९९ वाड्या-वस्त्यांमधील एक लाख ५९ हजार नागरिकांना ६९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या वाढत्या झळा लक्षात घेऊन जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने १९ कोटी १५ लाख ८५ हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्यामुळे पशुधनाच्या चाºयाचा जिल्ह्यातील प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यावर प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात ६० टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. यामध्ये नऊ टँकरची भर पडली आहे. सध्या पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया गेली आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळी स्थिती वाढू लागली असल्याने जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून गांभीर्याने उपाययोजना केल्या जात आहेत. पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरू करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७५ गावे, ७३४ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ५९ हजार लोकसंख्येला ६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जत तालुक्यातील ३४ गावे आणि २७९ वाड्या-वस्त्यांना ३८ टँकरने, आटपाडीतील २२ गावांमधील १७२ वाड्या-वस्त्यांना १८ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना सहा टँकरने, तासगावमधील तीन गावे आणि १३ वाड्या-वस्त्यांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील १० आणि ४७ वाड्या-वस्त्यांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मार्चअखेर १६९ टँकर सुरू करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करून जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात टँकरने : पाणी पुरवठातालुका गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्या टँकरजत ३४ २६७ ९७१०७ ३८क़महांकाळ १० ४७ १३७७२ ६तासगाव ३ १३ २१६४ १खानापूर ६ ० १२२१४ ६आटपाडी २२ १७२ ३४४५५ १८एकूण ७५ ४९९ १५९७१२ ६९पाण्यासाठी आंदोलने सुरूचसांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात अजूनही अनेक गावांमध्ये टँकरची मागणी होत आहे. त्यासाठी आंदोलनेही करण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दुष्काळग्रस्तांना सतावत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकSangliसांगली