सांगली : दिवाळीला दोनशे रुपयापर्यंत गेलेला झेंडू दिवाळीनंतर ५० रुपयावर आला आहे. तुळशीविवाहाला मागणी नसल्याने मिरजेत फुलबाजारात फुलांचे दर घटले आहेत. फूल उत्पादक शेतकऱ्यांना आता लग्नसराईची प्रतीक्षा आहे.मिरजेतील फुलांच्या बाजारात निशिगंध, झेंडू, गलांडा, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांचीही आवक होते. दरवर्षी दिवाळी व तुळशीविवाहाला झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळतो. मात्र, यावर्षी दिवाळीनंतर झेंडूसह अन्य फुलांचेही दर कमी झाल्याने बाजारातील उलाढाल घटली आहे. पिवळ्या झेंडूचा दर ५० रुपयांवर व केशरी झेंडू ४० रुपयांपर्यंत आहे.गुलाबाची फुले तीनशे रुपये शेकडा मिळत आहेत. चारशे रुपये किलोने विक्री होणारी शेवंती, निशिगंध, गुलाब, जरबेरा कार्नेशिया, गलांडा यासह सर्वच फुलांचे दर कमी आहेत. मिरजेतील मार्केट यार्डातील फुलबाजारात जिल्ह्यातून विविध प्रकारची फुले विक्रीसाठी येतात. फुलांचे किरकोळ विक्रेते या बाजारातून फुले खरेदी करतात. बाजारातून कर्नाटकासह मोठ्या शहरातही फुलांची निर्यात होते. दिवाळीनंतर मोठे सण उत्सव नसल्याने फुलांना दर मिळण्यासाठी लग्नसराईची प्रतीक्षा आहे.
लग्नसराईची प्रतीक्षातुळशीविवाहाला मागणी नसल्याने फुलाचे दर घटले आहेत. आता लग्नसराई व पुढील महिन्यात ख्रिसमससाठी फुलांना दर मिळण्याची शक्यता असल्याचे फुलविक्रेते सतीश कोरे यांनी सांगितले.
फुलांचे दरनिशिगंध - १०० रुपये किलोझेंडू - ५० रुपये किलोगलांडा - ५० रुपये किलोगुलाब - ३०० रुपये शेकडाशेवंती - ८० रुपये किलो