आॅनलाईन लोकमतमिरज, दि. १२ : येथील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ स्मृती संगीत महोत्सव २३ एप्रिलपासून सुरु होत आहे. या संगीत सभेत नामांकित गायक-वादक सहभागी होणार आहेत. मिरजेतील मीरासाहेब दग्यार्चा उरूस २२ एप्रिलपासून सुरु होत आहे. उरूसानिमित्त दरवर्षी अब्दुलकरीम खाँ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संगीत महोत्सवाचे यंदाचे ८३ वे वर्ष आहे. २३ एप्रिल रोजी दर्गा आवारातील चिंचेच्या झाडाखाली सकाळी साडेआठ ते १२ यादरम्यान किराना घराण्याचे शिष्य संगीत सेवा करणार आहेत. रात्री नऊ वाजता मुख्य संगीत सभेला सुरुवात होणार आहे.पहिल्या दिवशी सदाशिव मुळे, मिरज यांचे शहनाईवादन, उस्ताद फैय्याज खान, बेंगलोर यांचे गायन, षडज् गोटखिंडी, बेंगलोर यांचे बासरीवादन, सुचेता आठलेकर, मुंबई यांचे गायन, नूरजहाँ नदाफ, धारवाड यांचे सतारवादन, अली मिरजकर, मुंबई यांचे सोलो तबलावादन, उषा देशपांडे, मुंबई यांचे गायन, उस्ताद हाफीज खान, बेंगलोर यांचे सतारवादन, सौ. अश्विनी वळसंगकर, सोलापूर यांचे गायन, निनाद देठणकर, पुणे यांचे संतुरवादन आणि पहाटे आशिष रानडे, नाशिक यांचे गायन होणार अहे.२४ एप्रिल रोजी पंडित शैलेश भागवत यांच्या शहनाईवादनाने दुसऱ्या दिवशीच्या संगीत सभेला प्रारंभ होणार आहे. मीना फातर्फेकर, पुणे यांचे गायन, शफाअत नदाफ, सांगली यांचे सतारवादन, मुग्धा भट-सामंत, रत्नागिरी यांचे गायन, उस्ताद रफत खान, मुंबई यांचे सतारवादन, पंडित सुहास व्यास, आदित्य व्यास, पुणे यांचे गायन, पंडित चंद्रशेखर फणसे, मुंबई यांचे सतारवादन, पंडित आनंद भाटे यांचे गायन, पंडित विनायक ठाकरे, मुंबई यांचे व्हायोलिनवादन, पहाटे पंडित संदीप भट्टाचार्य, कोलकाता यांचे गायन होणार आहे.तिसऱ्यादिवशी २५ एप्रिल रोजी समारोप सभेत गिरीमल बजंत्री, विजापूर यांचे शहनाईवादन, कु. शिवानी मिरजकर, धारवाड यांचे गायन, पंडित योगराज नाईक, गोवा यांचे सतारवादन, वाणी हर्डीकर-हेगडे, यल्लापूर यांचे गायन, शंकर कुंभार, पुणे यांचे सोलो तबलावादन, पंडित जयतीर्थ मेऊंडी, हुबळी यांचे गायन, उस्ताद रफिक खान, धारवाड यांचे सतारवादन, पंडित सारथी चटर्जी, दिल्ली यांचे गायन, आदित्य सुतार, म्हैसाळ यांचे बासरीवादन, चेतना बनावत, मुंबई यांचे गायन होणार आहे.दर्गा आवारात दररोज रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत चालणाऱ्या या संगीत सभेचे संयोजन दर्गा सरपंच अब्दुल अजीज मुतवल्ली, सुरेश कपिलेश्वरी, बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मजिद सतारमेकर यांनी केले आहे.
मिरजेत २३ पासून दर्गा संगीत सभा
By admin | Published: April 12, 2017 4:07 PM