काँग्रेसच्या काळात अंबानी आता अदानींना पोसण्याचे काम, विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 12:52 PM2022-10-04T12:52:56+5:302022-10-04T13:04:53+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे.

During the Congress period, Ambani is now working to feed Adani, Criticism of former MLA Vilasrao Jagtap | काँग्रेसच्या काळात अंबानी आता अदानींना पोसण्याचे काम, विलासराव जगतापांचा भाजपला घरचा आहेर

संग्रहित फोटो

googlenewsNext

जत : कोणतेही सरकार असले तरी उद्योगपतींना पोसण्याचे काम करत असते. काँग्रेसच्या काळात अंबानींना पोसण्याचे काम झाले होते. या सरकारच्या काळात अदानींना पोसण्याचे काम सुरू असून, बळीराजा हा पोतराज बनला आहे, अशा शब्दांत माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.

जत येथे एका कार्यक्रमात विलासराव जगताप व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एका व्यासपीठावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांच्या मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांनी कार्यक्रमस्थळी हस्या पिकला.

विलासराव जगताप म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरी शेतकरी हा शोषित आहे. कोणाचेही शोषण झाले नाही एवढे शेतकऱ्यांचे शोषण झाले आहे. उद्योगपती, अभिनेते, सरकारी कर्मचारी यांना कधी आत्महत्या करावी लागत नाही; पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे सर्व बदलले पाहिजे.

जयंत पाटील म्हणाले, सरकार कोणाचे जरी असले तरी जत तालुक्यातील ६५ गावांना पाणी मिळणार आहे. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार असून, जत तालुक्याला हक्काचे पाणी देणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, सुभाष पाटील, शुभांगी बन्नेनवर, नाना शिंदे, सिद्धाप्पणा शिरशाड, इरण्णा निडोणी, माणिक बिजर्गी, प्रकाश बिज्जरर्गी, उत्तम शेठचव्हाण, उमेश सावंत, बाळ सावंत, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

विलासराव, अधूनमधून भेटत जावा

माजी मंत्री जयंत पाटील यांनी तुफान टोलेबाजी करत अनेक दिवस झाले, विलासराव जगताप भेटलेच नाहीत. कधीतरी अधूनमधून भेटत जावा. पक्ष कुठलाही असला तरी सर्वजण कार्यक्रमाला एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. पण विलासराव जगताप चिडतील असे काही कार्यक्रमात बोलायचे नाही, असे सांगताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

Web Title: During the Congress period, Ambani is now working to feed Adani, Criticism of former MLA Vilasrao Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.