शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

कोरोनाकाळात मिळालेले दीडशेवर व्हेंटिलेटर्स झाले भंगार, कोट्यवधी रुपये पाण्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 5:50 PM

सदोष सॉफ्टवेअर, निकामी सेन्सर्स

सांगली : कोरोनाकाळात ‘पीएम केअर’ निधीमधून जिल्ह्याला तब्बल १५२ व्हेंटिलेटर्स मिळाले, पण त्यातील बरेच बिनकामाचे ठरले आहेत. मोठा गाजावाजा करून मिळालेले कोट्यवधी रुपये किमतीचे व्हेंटिलेटर्स आजही विविध शासकीय रुग्णालयांत धूळ खात पडून आहेत.आरोग्य यंत्रणेने काही व्हेंटिलेटर्स जुगाड करून कार्यान्वित केले, पण आता कोरोना संपल्यावर त्यांचे रूपांतर अक्षरश: भंगारात झाले आहे. कोरोनाकाळात व्हेंटिलेटरबाबत जिल्ह्याची स्थिती आणीबाणीची होती. व्हेंटिलेटर बेडअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागले. कोरोनाच्या धांदलीत म्हणजे एप्रिल २०२१ मध्ये ‘पीएम केअर’मधून एकदम १५२ व्हेंटिलेटर मिळाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलास मिळाला; पण व्हेंटिलेटर्सचे खरे स्वरूप पुढे येताच आनंदावर विरजण पडले. सदोष व्हेंटिलेटर्स म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरली.त्यांची दुरुस्ती स्थानिक स्तरावर शक्य नव्हती. नादुरुस्तीच्या कारणास्तव परत पाठविल्यास पुन्हा लवकर मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे जुगाड करून वापरात आणणे हा एकमेव पर्याय होता. शासकीय रुग्णालयाच्या अभियंत्यांनी कसब पणाला लावून त्यामध्ये प्राण फुंकले. कसरत करत वापरले.पुरवठादार कंपनीने व्हेंटिलेटर्ससाठी वॉरंटी कालावधी दिला होता; पण कोरोनाच्या धांदलीच्या काळात ती दुरुस्तीसाठी कंपनीकडे परत पाठविणे किचकट काम होते. लवकर दुरुस्तीचीही शक्यता नव्हती. त्यामुळे तशीच वापरण्याचा प्रयत्न केला. कोरोना संपल्यावर त्यांचे महत्त्व कमी झाले. तातडीची बाब म्हणून शासनाने प्रत्येक रुग्णालयाला तात्पुरत्या स्वरूपात जैववैद्यकीय अभियंता नेमून व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून घेण्यास सांगितले होते. सांगली, मिरजेतील रुग्णालयांत दुरुस्त्या झाल्या, पण कवठेमहांकाळ, तासगाव, आदी ग्रामीण रुग्णालयांत मात्र सगळाच सावळागोंधळ होता.

अनेक दोषया व्हेंटिलेटर्समध्ये अनेक दोष आहेत. काहींच्या सेन्सरमध्ये बिघाड आहे. मिरज कोविड रुग्णालयात बसविलेल्या २० व्हेंटिलेटर्समध्ये सॉफ्टवेअरची समस्या होती. काही तास-दोन तासांतच बंद पडायचे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना डोळ्यांत तेल घालून त्यावर लक्ष ठेवायला लागायचे. रुग्णालयाने मोठी झटापट करून ते सुरू करण्यात यश मिळविले. रुग्णांचे प्राण वाचविले.युपीएस काढले, सांगाडे राहिलेकोरोनाचा ताण कमी झाल्यावर काही तंदुरुस्त व्हेंटिलेटर्स नियमित रुग्णांसाठी वापरात आणले आहेत. उर्वरित व्हेंटिलेटर्सची वीजपुरवठा यंत्रणा (युपीएस) काढून अन्य उपकरणांसाठी वापरात आणली आहे. व्हेंटिलेटर्सचे सांगाडे मात्र पडून आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल