शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

लोकसभा निवडणुकीच्या काळात सांगलीत २० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 6:35 PM

कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस दल सज्ज

सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा पोलिस दलाने ३२०५ लिटर दारू, २८ किलो गांजा, ४०७४ किलो गुटखा, १९ किलो व्हेल माशाची उलटी, असा २० कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी बजावली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी पोलिस दल सज्ज असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.अधीक्षक घुगे म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे पालन केले जावे, यासाठी पोलिस दल सज्ज आहे. आतापर्यंत शस्त्र परवानाधारक २,४७४ पैकी २,१२३ जणांकडील शस्त्रे जमा केली आहेत. २४५ जणांना सवलत दिली असून, अद्याप १०२ शस्त्रे जमा करणे बाकी आहे. जिल्ह्यात ९ आंतरराज्य आणि १६ आंतरजिल्हा तपासणी नाके आहेत. या नाक्यावरून दारू, अमली पदार्थ, रोकड याची वाहतूक होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.अधीक्षक घुगे म्हणाले, आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात २२५४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ३६ गुन्हेगारांना हद्दपार केले. विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या २३ जणांना अटक केली. तपासणी नाक्यांवर २० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त केला. अवैध धंद्यावर छापेमारी, कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे. उशिरापर्यंत हॉटेल्स, ढाबे, बार सुरू राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे.बीट मार्शल, गस्ती पथके, भरारी पथके दक्ष ठेवण्यात आली आहेत. प्रचार काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रचारामध्ये पोलिस बंदोबस्त, रहदारीस अडथळा होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. व्हीआयपी बंदोबस्तात सीसीटीव्ही, व्हिडीओ शूटिंग, ड्रोन कॅमेरे तैनात केले जातात. आरसीबी, क्यूआरटी पथक, भरारी पथक सज्ज असून आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.

सोशल मीडियावर लक्षआक्षेपार्ह व्हिडीओ, पाेस्ट व्हायरल होणार नाहीत, यासाठी सायबर सेल कार्यरत आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवले आहे. सी-व्हिजिल ॲपवर नागरिकांना तक्रार करता येते.

मतदान केंद्रांवर बंदोबस्तजिल्ह्यात २,४४८ मतदान केंद्रे आहेत. केंद्रांवर तसेच शंभर मीटर परिसरात स्वतंत्र बंदोबस्त राहणार आहे. पोलिस दलासह केंद्र व राज्य राखीव दल, होमगार्ड यांची मदत घेतली जाणार आहे.

मतदानाचा हक्क बजवावानिवडणूक काळात अफवांवर विश्वास ठेवू नका. मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीचा हा उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावा, असे आवाहन अधीक्षक घुगे यांनी केले.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Policeपोलिस