शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दुर्योधन, दु:शासन युती होऊनही भाजप अजिंक्य: सुरेश हाळवणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:08 PM

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव ...

सांगली : दुर्योधन व दु:शासन हे एकत्रित येऊनही त्यांना महापालिकेत भाजपला विजयापासून रोखता आले नाही. तसेच मित्रपक्ष म्हणविणाऱ्या शिवसेनेचीही चांगलीच फसगत झाली, अशी टीका पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी पक्षीय पदाधिकाºयांच्या मेळाव्यात मंगळवारी केली.सांगलीत पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार आदी उपस्थित होते.हाळवणकर म्हणाले की, महाराष्टÑातील जनतेचा कौल हा भाजपच्याच बाजूने मिळत आहे. बुथनिहाय तयारी करण्यात आल्यानेच हे यश आपल्या पदरी पडले आहे. आपल्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी हे दुर्योधन आणि दु:शासन होते. त्याचप्रमाणे स्वबळाचा नारा देणारा शिवसेना हा पक्षदेखील होता. त्यामुळे कोणीही आपल्यासमोर उभे ठाकले तरी, त्यांचा पराभवच होतो, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या हातात सत्तासूत्रे आल्याने आता शहराचा हमखास विकास होईल.मराठा आरक्षणासंदर्भात हाळवणकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे. प्रस्थापित मराठा नेत्यांच्या शिक्षण संस्था, कारखाने, तसेच अन्य व्यवसाय आहेत. परंतु त्यांनी मराठा समाजातील लोकांना आजपर्यंत काहीही दिलेले नाही. याचा संताप आंदोलकांच्या मनात आहे. आरक्षण देण्यास फडणवीस सरकार बांधील आहे. मध्यंतरी एक मोर्चा मुंबईत सरकारच्या विरोधात काढण्यात आला होता. त्यानंतर सरकारने त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला.मराठा समाज जागरुक आहे. कॉँग्रेस सरकारने २०१४ मध्ये आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. मात्र तो न्यायालयात टिकला नाही. साहजिकच फडणवीस सरकारने त्या अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात केले व नोव्हेंबरअखेरपर्यंत आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेतला जाईल, एवढेच नव्हे, तर धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात देखील मार्ग काढला जाईल, असे सांगितले.देशमुख म्हणाले की, महापालिका जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे शहरातील कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली, त्याच पध्दतीने ग्रामीण भागातील विस्तारक व कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिका निवडणुकीतील यशामुळे भाजप कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण झाली आहे. महापालिका ताब्यात आल्याने खºयाअर्थाने जिल्हा भाजपमय झाला आहे. आता लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्याने याची तयारी सुरु झाली आहे.शिवसेना स्वतंत्र : नावालासुद्धा नाहीमित्रपक्ष म्हणविणाºया शिवसेनेनेसुद्धा महापालिका निवडणुकीत त्यांची ताकद अजमाविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तब्बल ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र त्यातील ९० टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकाही जागेवर त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे आमच्यासमोर कोणाचीही डाळ शिजली नाही, असे हाळवणकर यांनी यावेळी सांगितले.तंत्रज्ञानाशी जवळीक करा!भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अद्ययावत तंत्रज्ञानाशी परिचित असला पाहिजे. पंतप्रधानांनी ‘नमो अ‍ॅप’ विकसित केले आहे. ते कितीजणांकडे आहे? असा प्रश्न हाळवणकर यांनी विचारताच, सभागृहातील फारच कमी हात वर आले. त्यामुळे हाळवणकर यांनी मेळाव्यातच सर्वांकडून अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले.आज विजयी मेळावासांगली : नुकत्याच झालेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केल्यानंतर या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सांगलीत ८ आॅगस्ट रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, भाजपचे प्रदेश संघटन प्रमुख रघुनाथ कुलकर्णी, रवी अनासपुरे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. महापालिका निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनीच विजयोत्सव साजरा केला होता. नेतेमंडळींना एकत्रित येता आले नव्हते. त्यामुळेच मेळाव्याचे आयोजन केले आहे.