शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा, मिळणार ई-शिधापत्रीका

By संतोष भिसे | Published: May 06, 2024 4:36 PM

फसवणूक टळणार

घाटनांद्रे : गेल्या अनेक दशकांपासून प्रचलित असणारी कागदी शिधापत्रिका आता इतिहासजमा होणार आहे. लाभार्थ्यांना शासनामार्फत आता ई-शिधिपात्रिका देण्यात येणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सवलतीत धान्य किंवा अन्य शासकीय योजनांच्या लाभासाठी प्रत्येक कुटुंबाकडे शिधापत्रिका असते. योजना न घेणाऱ्या कुटुंबांना महसुली पुरावा म्हणूनही ती आवश्यक ठरते. अनेक कुटुंबे चरितार्थासाठी गाव सोडून अन्यत्र राहतात. त्यांच्या शिधापत्रिकेवर गावाकडील पत्ता असल्याने धान्यही गावातील दुकानातच मिळते. दूर गावी राहणाऱ्या कुटुंबांना धान्यासाठी गावी येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शासनाचा धान्य वितरणाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता. स्वस्त धान्य दुकानदारांकडून त्यांच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याच्या तक्रारीही यायच्या. यावर उपाय म्हणून आधार सिडींग, पॉस मशिन, बोटांचे ठसे आदी उपाययोजना करण्यात आल्या.बानव्या योजनेनुसार आता सर्वच म्हणजे केशही, पिवळी अशा शिधापत्रिका प्रत्यक्षात देण्याचे बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी ई-शिधापत्रिका मिळतील. त्यासाठी नागरी पुरवठा विभागाचे ॲप मोबाईलवर डाऊनलोड करुन घ्यावे लागेल. ई शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करावी लागतील.  तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, त्यांना तहसील कार्यायल किंवा सेतू केंद्रात जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

फसवणूक टळणारआतापर्यंत शिधापत्रिका काढून देताना एजंटांकडून नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार घडायचे. पण आता ती टळणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. गैरप्रकारांना कोणताही थारा राहणार नाही. ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रे दाखल करता येणार नाहीत.कवठेमहांकाळ तालुक्यात २४ हजार ६७० शिधापत्रिकाधारक कवठेमहांकाळ तालुक्यात ९१ स्वस्त धान्य दुकाने व २४ हजार ६७० शिधापत्रिकाधारक आहेत. अंत्योदय योजनेचे १५७५ शिधापत्रिका असून ६ हजार ७७४ नागरिकांना मोफत धान्य दिले जाते. अन्न सुरक्षा योजनेत २३ हजार ९५ शिधापत्रिकांद्वारे १ लाख ५ हजार ७२४ नागरिकांना धान्य मिळते.

नागरिकांनी फाटक्या शिधापत्रिका बदलून घ्याव्यात. गहाळ झालेली जुनी कागदी शिधापत्रिका बदलून नवी दुय्यम प्रत काढून घ्यावी. तसेच ई- शिधापत्रिकाही काढून घ्यावी. -  अशोक कचरे, पुरवठा निरिक्षक, तहसील कार्यालय, कवठेमहांकाळ

टॅग्स :Sangliसांगली