विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात आज सोमवारी रोजी सकाळी ६:४७ वाजता सौम्य ३ रिस्टर स्केलचा भूकंप जाणवला. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. तसेच चांदोली धरणास कोणताही धोका झालेला नाही अशी माहिती शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली.सकाळी ६:४७ वाजता ३ रिस्टर स्केलचा भूकंप झाला. हा भूकंप साडेसात सेकंद जाणवला असून त्याचा केंद्रबिंदू चांदोली धरणा पासून १४.४० किलोमीटर वर होता. २ फेब्रुवारी २०११ पासून ३ रिस्टर स्केल वरील झालेला हा ९० वा भूकंप आहे. दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३५ वाजता सौम्य ३.२ रिस्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. त्याचा केंद्रबिंदू चांदोली धरणा पासून १५.२ किलोमीटर वर होता.
Sangli: शिराळ्यात भूकंपाचा धक्का, केंद्रबिंदू चांदोली धरणापासून १४ किलोमीटरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:56 PM