लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर गृहिणींना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाचे भाव सरासरी १५ ते २० रुपयांनी उतरले आहेत.
गेल्या दीड वर्षापासून खाद्यतेलाच्या किमतीची कमान चढती आहे. १८० रुपये किलोवर पोहोचलेली भाववाढ अभूतपूर्व अशीच ठरली. दोन महिन्यांपासून त्यात किंचित घसरण सुरू आहे. ऑगस्टच्या तुलनेत तर १५ ते २० रुपयांनी दर उरले आहेत. मोहरी तेलाचे भाव मात्र ५ ते १५ रुपयांनी वाढले आहेत.
कोट
किमती आणखी कमी व्हायला हव्यात
सध्या दसरा व दिवाळीचे सण तोंडावर आहेत. या काळात तेलाचा वापर खूपच होतो. सध्या तेलाचे भाव थोडेफार कमी होत असले, तरी अजूनही कमी व्हायला हवेत. विशेषत: शेंगतेल सोयाबीन तेल व पामतेलाचे भाव कमी झाले पाहिजेत.
- गीतांजली बेडगे, गृहिणी, सांगली
सरकारने पामतेलाची आयात मोठ्या प्रमाणात केली तरच अन्य खाद्यतेलांचे भाव उतरतील. सध्या १५-२० रुपयांनी किमती कमी झाल्याने सणासुदीच्या खरेदीच्या बजेटमध्ये फार मोठी बचत होणार नाही. पण, ही स्वस्ताईदेखील ठीकच मानायची.
वैशाली जाधव, गृहिणी, सांगली
कोट
केंद्र सरकारने तेलाच्या आयात शुल्कात कपात केल्याने दरांमध्ये किंचित घसरण झाली आहे. परदेशात कच्च्या पामतेलाचे दरही कमी झाल्याचा फायदा मिळत आहे. पामतेलाची आवक वाढताच अन्य तेलांचे भाव भरभर खाली येतील.
- गजेंद्र कुल्लोळी, तेल व्यापारी, मिरज
ग्राफ
तेल ऑगस्ट सप्टेंबर
सोयबीन १६० १५२
सूर्यफूल १६५ १५५
करडई २६० २५०
पामतेल १५५ १४०
शेंगदाणा १९० १७०
मोहरी १८० १९०
तीळ १८५ १८०