लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नववर्षाची सुरूवात आणि बाजारपेठेसह सर्वांना मकरसंक्रातीची चाहूल लागली असताना, किराणा मालाच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. खाद्यतेलाच्या दरातील वाढ थांबली होती मात्र, या आठवड्यात पुन्हा एकदा सरकी, सुर्यफूल तेलाच्या दरात १० ते २५ रूपयांची वाढ झाली. या आठवड्यात गाजराची आवक चांगली सुरू असून, पातीचा कांदाही उपलब्ध झाला आहे.
नववर्षाची सुरूवात मध्यमवर्गीयांसह सर्वच घटकांना चिंताजनक ठरली आहे. आवकेवर व उत्पादनावर मर्यादा असल्याने खाद्यतेलासह किराणा सामानाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना झळ सोसावी लागली आहे.
संक्रातीनंतर वातावरणात होणारा बदल व त्यानंतर भाजीपाल्याच्या आवकेवरही परिणाम होत असतो. त्यानुसार आता पातीचा कांदा, लसूण बाजारात आली आहे. गाजराची चांगली आवक असलीतरी दर स्थिर आहेत. पावट्याचेही विविध प्रकार विक्रीसाठी आले आहेत. त्यातही पालेभाज्यांच्या मागणीत नेहमीप्रमाणे वाढ असल्याचे बाजारपेठेत दिसून आले.
चौकट
नवा गहू बाजारात येण्यास अद्याप कालावधी असलातरी सध्या येणाऱ्या गव्हाचे दर वाढले आहेत. पंधरवड्यापूर्वी सरासरी २८ रूपये प्रतीकिलो असणारा गहू आता ३० ते ३२ रूपयांवर जावून पोहोचला आहे. तांदळाचेही दर वाढले आहेत. कडधान्याची आवक आता चांगली होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकट
कलिंगडाबरोबरच सफरचंद, पेरूला ग्राहकांची मागणी आहे. त्यातही चांगल्या चवीचा संत्री उपलब्ध झाले आहेत. दरात घट होताना ४० ते ६० रूपये किलोने ते मिळत आहेत.कलिंगडाबरोबरच सफरचंद, पेरूला ग्राहकांची मागणी आहे. त्यातही चांगल्या चवीचा संत्री उपलब्ध झाले आहेत. दरात घट होताना ४० ते ६० रूपये किलोने ते मिळत आहेत.
चौकट
थंडीची चाहूल लागली की बाजारात गाजरांची आवक वाढत असते. यंदा काहीशी उशिरा गाजरे बाजारात आली आहेत. आता पुढील तीन चार महिने गाजरांची उपलब्धता असणार आहे. गाजरांसह करडई, शेपूच्या भाजीचीही चांगली आवक असलीतरी गाजराला ग्राहकांकडून मागणी आहे.
कोट
आम्हा गृहीणींना काहीसे संमिश्र वातावरण सध्ता आहे. भाजीपाला स्वस्त व चांगला मिळत असताना तेलाचे दर वाढले आहेत. संक्रातीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करणार आहे.
कोट
पालेभाज्यांची चांगली आवक सध्या होत आहे. जयसिंगपूरसह मिरज पूर्वभागातील भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. मेथीच्या दरात या आठवड्यात वाढ झालेली आहे.
- सुभाष पाटील, व्यापारी