शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

अंनिस वार्तापत्राचे संपादक प. रा. आर्डे यांचे सांगलीत निधन

By संतोष भिसे | Published: October 14, 2022 12:55 PM

अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत धडाडीने काम करणाऱ्या प्रा. आर्डे यांच्या निधनाने चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि अंनिस वार्तापत्राचे संपादक प्रा. परशराम राऊ तथा  प. रा. आर्डे (वय ८१) यांचे आज, शुक्रवारी (दि. १४) पहाटे सांगलीत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी उषाताई, मुलगा विनय, मुलगी रुपाली यांच्यासह सून, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. आर्डे यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आले.अंनिसच्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत धडाडीने काम करणाऱ्या प्रा. आर्डे यांच्या निधनाने चळवळीतील कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक म्हणून १९ वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. फसव्या विज्ञानाचे अभ्यासक, लेखक, वक्ते, हसत खेळत विज्ञान सांगणारे कार्यकर्ते अशा अनेकविध भूमिकांत अखेरपर्यंत कार्यरत राहिले.  प्रा. आर्डे यांचे मूळ गाव चोपडी (ता. पाटण, जि. सातारा) होते. १९६८ पासून रयत शिक्षण संस्थेत भौतिक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. १९८५ पासून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी वाहून घेतले. बुवाबाजीविरोधात संघर्ष, वैज्ञानिक जाणिवा शिबिरे, शाळा, महाविद्यालयांतून अंधश्रद्धा निर्मूलनावर व्याख्याने, लेखन याद्वारे अविरत कार्यरत राहिले. वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर 'हसत-खेळत विज्ञान' या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन केले होते. सन १९९५ पासून अंनिस वार्तापत्रात सहसंपादक, तर सन २००२ पासून प्रमुख संपादकपदाचा कार्यभार सांभाळला होता.  प्रा. आर्डे यांनी विविध पुस्तकांचे लिखाणही केले. अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे, विज्ञान व अंधश्रद्धा, आत्मा-पुनर्जन्म : प्लँचेट, वेध विश्वाचा व मानवी शौर्याचा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.अनेक पुरस्कारांनी गौरवत्यांना डॉ. अरूण लिमये पुरस्कार, राज्य शासनाचा उत्तम साहित्य पुरस्कार, कराड येथील पी. डी. पाटील गौरव पुरस्कार, सांगलीतील मराठा समाजातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले होते. महाराष्ट्र अंनिसने जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.

टॅग्स :Sangliसांगली