शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

शिक्षण संस्था चालकांचा बारावी, दहावी परीक्षांवर बहिष्कार - रावसाहेब पाटील

By अशोक डोंबाळे | Published: January 12, 2024 5:23 PM

सांगली : पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरली आहे. २०१७ पासून शिक्षक भरती नाही. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ...

सांगली : पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरली आहे. २०१७ पासून शिक्षक भरती नाही. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी ग्रामीण शिक्षण व्यवस्था शासनाने विस्कळीत केली आहे. शासन अनुदानित मराठी शाळा संपवून शिक्षण व्यवस्था उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून बारावी, दहावी परीक्षांवर राज्यातील शिक्षण संस्था चालकांनी बहिष्कार घातला आहे, अशी माहिती शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

रावसाहेब पाटील म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले की, शासन शिक्षण संस्था चालकांच्या प्रश्नावर बैठका घेऊन केवळ आश्वासन देत असून त्या पलिकडे काहीच केले नाही. वेतनेतर अनुदान देण्यात शासनाने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आता माघार नाही. तातडीने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवा. अन्यथा दहावी व बारावीच्या परीक्षावर टाकलेला बहिष्कार कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. परीक्षासाठी इमारती व कर्मचारी देणार नाही असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला आहे. महामंडळाने तशी नोटीसही शासनास दिली असून या निर्णयावर राज्यातील सर्व खासगी शिक्षण संस्था ठाम आहेत. राज्यातील नऊ विभागीय बोर्ड परीक्षा मंडळानांही परीक्षा बहिष्काराच्या नोटिसा शिक्षण संस्था महामंडळाच्या विभागीय मंडळांनी दिल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी शासनाचीशासनाने आडमुठे धोरण घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करु नये. शासनाचे धोरण हे बहुजन शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करणारे आहे. गुणवत्ता ढासळत चालली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण संस्था महामंडळास नाईलाजाने परीक्षेवर बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असेही रावसाहेब पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली