चिकुर्डे येथील नदीकाठावरील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला होता. पुराच्या धास्तीने जवळपास सर्व लोकांनी स्थलांतर केले होते, मात्र भोसले वस्ती येथील काही जण घरातच थांबले होते. मात्र पुराच्या पाण्याचा वेग वाढला तसा नागरिकांचा धीर सुटला. त्यातील दीपक भोसले यांनी गावातील नागरिकांशी संपर्क करून याची माहिती दिली. त्यानंतर शनिवारी सकाळी एनडीआरएफ व व्हाइट आर्मीच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने दीपक भोसले यांच्यासह आठ जणांना सुखरूप बाहेर काढले.
येथील दीपक भोसले व उत्तम भोसले यांची नऊ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. तर अमर गुजले यांची दुचाकी ग्रामपंचायत जवळील ओढ्यामध्ये वाहून गेली. ठाणापुढे गावास पाण्याचा वेढा हळूहळू कमी होत आहे.
दरम्यान, आ. मानसिंगराव नाईक, शिवसेना नेते अभिजित पाटील यांनी येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.