शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

सांगलीत संगीत क्लबचा अठरा वर्षांचा सिलसिला

By admin | Published: March 10, 2017 12:16 PM

जुन्या, अवीट गोडीच्या गीतांचे शौकिन सर्वत्र सापडतात. मात्र सांगलीत अशा दर्दींनी ‘यादे सिने संगीत क्लब’ स्थापन करून अठरा वर्षे या गाण्यांची गोडी जोपासली आहे.

दर्दींनी केली स्थापना : विविध विषयांवर रंगते सुरेल मैफल

अंजर अथणीकर, ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. १० -  जुन्या, अवीट गोडीच्या गीतांचे शौकिन सर्वत्र सापडतात. मात्र सांगलीत अशा दर्दींनी ‘यादे सिने संगीत क्लब’ स्थापन करून अठरा वर्षे या गाण्यांची गोडी जोपासली आहे. डॉक्टर, अभियंते, वकील, प्राध्यापक मंडळींसह उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांसह सुमारे दीडशेजण या क्लबमध्ये सहभागी झाले आहेत. अठरा वर्षापूर्वी या क्लबचे काहीजण एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने एकत्रित आले. तेव्हा कार्यक्रमस्थळी जुनी गाणी स्टेरिओवर वाजत होती. बरेच जण ही गाणी ऐकण्यात मग्न झाले होते. एकमेकांच्या चौकशीत सर्वांनाच जुन्या गाण्यांचा छंद असल्याचे दिसून आले. त्याचवेळी अशा छांदिष्टांचा क्लब काढण्याचा निर्णय झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सतीश डोडिया यांनी बैठक बोलावली आणि या बैठकीत ‘यादे सिने संगीत क्लब’ या नावावर शिक्कामोर्तब झाले. पद्माताई पुरोहित संस्थापक-अध्यक्षा झाल्या. सध्या या क्लबमध्ये डॉ. सुनील पाटील, शिरीष जोशी, अविनाश टिळक, डॉ. भरत शहा, रमेश शहा, डॉ. अनिल मडके, डॉ. सुहास पाच्छापूरकर, अभियंते विनायक रसाळ, प्रा. श्रीराम कानिटकर, डॉ. कुंदा पाच्छापूर, महेश कराडकर आदी विविध क्षेत्रातील, व्यवसायातील सुमारे दीडशे सभासद आहेत. प्रत्येक पंधरवड्याला, विविध दिनांचे औचित्य साधून ते जुन्या गाण्यांची मैफल आयोजित करतात. कुंदनलाल सैगलपासून तलत मेहमूद ते किशोरकुमारपर्यंत आणि शमशाद, उमादेवीपासून ते आशा भोसलेंपर्यंतच्या सर्व गायक-गायिकांनी गायिलेल्या अविस्मरणीय गीतांची दृकश्राव्य सुरेल गीतांची मैफल आयोजित करण्यात येते. या क्लबमधील बहुतांशी सभासदांचा आवाजही चांगला आहे. त्यामुळे तेच कार्यक्रम सादर करतात. बहुतांश वेळा वादकही सभासदच असतात. काहीजणांनी आपापल्या आवडत्या गायकांची संपूर्ण माहिती व चित्रफित संकलित केली आहे. एखादे गीत सादर करण्यापूर्वी गायकाची पूर्ण माहिती, संबंधित गीताची रचना होण्यामागील घडामोडी, गीत सादर करताना झालेले व्हिडीओ रेकॉर्डिंग यांची चित्रफीत सादर करण्यात येते. यामुळे रसिकांंना गाणे ऐकण्यापूर्वीच त्याचे महत्त्व आणि दुर्मिळ माहिती मिळण्यास मदत होते. बऱ्याचवेळा मुख्य गायकाच्या आवाजात गाणे रेकॉर्डिंग करण्यापूर्वी सहाय्यकांकडून ते गायले जाते. अशा मूळ आणि दुर्मिळ गीतांचाही संग्रह सभासदांनी केला आहे. अशी गाणी आॅडिओ आणि व्हिडीओ पध्दतीने सादर करण्यात येतात. हिंदी-मराठी चित्रपटांच्या गाण्यातील अभिनेता, अभिनेत्रीपासून १९८० पूर्वीच्या सर्व गायकांच्या गीतांचे कार्यक्रम होतात. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनापासून प्रजासत्ताक दिन, महिला दिन, वन दिन, पौर्णिमा यानिमित्ताने त्या त्या विषयावरील कार्यक्रमही होतात. शास्त्रीय संगीतातील रागावर आधारित गाणीही सादर केली जातात. विशेष म्हणजे अनेक सभासद ‘कानसेन’ असून, त्यांना शास्त्रीय रागांचे ज्ञानही आहे. सामाजिक मदतीसाठीही या क्लबकडून कार्यक्रम होतात. मात्र या कार्यक्रमांना कोणतेही व्यावसायिक स्वरूप देण्याचे आजपर्यंत कटाक्षाने टाळले आहे.

नदीया किनारेमहिन्यापूर्वी सांगलीतील कृष्णा नदीतच रंगमंच उभा करून ‘नदीया किनारे’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यातील सर्व गाणी ही ‘नदी’ या संकल्पनेवर आधारित होती. सांगलीच्या शौकिनांना या कार्यक्रमाचा आगळावेगळा आनंद मिळाला. एखाद्या विषयावरील संपूर्ण माहितीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

तलत मेहमूद यांची मैफलअलवार, मुुलायम, तरल अशा मखमली आवाजाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे, चित्रपट संगीताला नवा आयाम देणारे दर्दभरी गायक तलत मेहमूद यांच्या हिंदी, बंगाली आणि इतर अनेक भाषांतील गीतांचा कार्यक्रम या क्लबकडून नुकताच सांगलीत सादर करण्यात आला. या अविस्मरणीय गीतांच्या दृकश्राव्य सुरेल मैफलीस सांगलीकरांनी चांगलीच दाद दिली.